कुटुंबासह PM मोदींची भेट म्हणजे CM शिंदेंचा सेंडऑफ; 10 ऑगस्टला राजकीय भूकंप निश्चित!

कुटुंबासह PM मोदींची भेट म्हणजे CM शिंदेंचा सेंडऑफ; 10 ऑगस्टला राजकीय भूकंप निश्चित!

मुंबई : महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच असतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठामपणे स्पष्ट केल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याबाबातच्या चर्चा सुरुच आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अभिजीत वंजारी आणि विधानसभेचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याची री ओढत 10 ऑगस्टला एकनाथ शिंदें यांचा राजीनामा होणार असल्याचं म्हंटलं आहे. तसंच ही चर्चा फक्त आमच्यातच नाही तर विधिमंडळातील सर्वच आमदारांमध्ये याबाबतची कुजबूज सुरु आहे, असंही आमदार वंजारी म्हणाले. (Chief Minister Eknath Shinde will resign on August 10 said Congress MLA in assembly)

काय म्हणाले अभिजीत वंजारी?

तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब दिल्लीला गेले होते. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सहकुटुंब भेट घेतली. याच भेटीचा संदर्भ देत आमदार वंजारी म्हणाले, एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटणे, ही काही चुकीची गोष्ट नाही. अशा भेटीगाठी होत असतात. पण संपूर्ण कुटुंबासोबत भेटणं म्हणजे त्यांचा सेंड ऑफ तर नाही ना?, अशी चर्चा विधिमंडळातील सर्व आमदारांमध्ये सुरु आहे.

बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार

एका निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर 3 महिन्यांमध्ये निर्णय घ्यायचा आहे. 11 मे रोजी न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल सुनावला आहे. यानुसार 10 किंवा 11 ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. या निर्णयात कदाचित एकनाथ शिंदे यांना सेंडऑफ दिला जाईल आणि अजित पवार यांच्याकडे राज्याची सुत्रे सोपविली जातील. फडणवीस यांनी कितीही ठामपणे सांगितलं तरीही राजकारणात खेळी थोड्या सांगितल्या जातात? असा प्रतिसवाल वंजारी यांनी केला.

समृद्धीवर तंत्र-मंत्र! पुजा करून अपघातग्रस्तांना श्रद्धांजली; तरूणाविरोधात गुन्हा दाखल

राजकारणात प्रत्येक दिवशी जे घडणार ते सांगायचे नसते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार, हे सांगितलं होतं का? असा सवाल करत ज्या दिवशी घडेल, त्यादिवशी आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली काम करु असं बोलतील, असंही वंजारी म्हणाले. दरम्यान, वंजारी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनीही 10 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सेंड ऑफ असेल असं भाकीत वर्तविलं आहे. त्यामुळे राज्यात शिंदे यांच्या राजीनाम्याची कुजबूज थांबताना दिसून येत नाही.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर फडणवीस म्हणाले, आमच्या मनात कोणताही संभ्रम नसून महायुतीतल्या नेत्यांच्या मनात संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आमच्यात कसलाही संभ्रम नाही. अनेक राजकीय नेते भविष्य सांगत आहेत, परंतु त्यांचं काही खरं नाही. मी अधिकृतपणे सांगतो की, येत्या 9, 10, 11 तारखेला काहीही होणार नाही, झालंच तर आमचा विस्तार होणार आहे, त्यामुळे आता समझदार को इशारा काफी है. तसेच महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं आहे. एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार हे तिन्ही नेत्यांना पक्कं माहिती आहे. त्यामुळे वावड्या उठवणं बंद करा, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube