काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

Chandrasekhar Bawankule On Congress : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाला. त्यामुळं आता राज्यात शिंदे गट-भाजप-अजित पवार गट सत्तेत आहेच. भाजपने आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादीत फुट पाडली. त्यामुळं महाविकास आघाडीची सध्याची अवस्था प्रचंड वाईट झाली. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी कॉंग्रेस पक्षात संशयाचे वातावरण असून कॉंग्रेसमध्ये (Congress) कधीही स्फोट होऊ शकतो, असं मोठं विधान केलं. (Chandrasekhar Bawankule On Congress After Shiv Sena NCP in Congress will Rebellion)

आज पुण्यात घर चलो अभियानाच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कॉंग्रेसची अवस्था प्रंचड वाईट आहे. सध्या कॉंग्रेसमध्ये संशयाचं वातावरण आहे. त्यामुळं कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेताही ठरत नाही आणि ते ठरवूनही शकत नाही. कारण, विरोधी पक्षनेत्यावरूही त्यांच्या भांडण होतील. कॉंग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे. कॉंग्रेसचे आमदारही संभ्रमावस्थेत आहेत. मोदीजी पंतप्रधान होणार असल्यानं २०२९ पर्यंत त्यांना स्कोप नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळं कॉंग्रेस पक्षात कधीही स्फोट होऊ शकतो, असं बावनकुळे म्हणाले.

तुम्ही भाजपशासित राज्य सरकारांवर कारवाई का करत नाही? सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले 

ते म्हणाले, कॉंग्रेसला आता घर सांभाळणंही मुश्कील आहे. कॉंग्रेसचे अस्वस्थ आमदारही आता विकासाच्या बाजूने येणार आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील वाटतं, की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. सध्या कॉंग्रेसच्या आमदारांचा सभागृहाच्या कामकाजात फारसा सहभाग नसतो. कॉंग्रेसचे आमदार फक्त फोटो काढण्यासाठी सभागृहात एकत्र येतात, असंही बावनकुळे म्हणाले.

आम्ही कुणाला टार्गेट करत नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष असावा, पण त्यांना विरोधी पक्षनेताच ठरवता येत नाही. आणि आम्ही काही संन्यासी नाही. आम्ही कोणालाही पक्षप्रवेश द्यायला तयार आहोत. कोणी कॉंग्रेस नेत्यांकडून आमची स्वीकारण्याची तयारी दाखवली तर आम्ही त्याला पक्षात घेऊ, असंही बावनकुळे म्हणाले.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना बावळकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील प्रवास योजना सुरू आहे. आज विनोद तावडेंनी 8 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीने केलाय. प्रत्येक मतदारसंघात 500 पदाधीकारी या मतदारसंघांमधे काम करणार आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुक लढवण्यात येईल. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना भाजप ताकद देईल. 45 जागा आम्ही जिंकू. बारामतीत महायुतीचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका करतांना खेकड्याची उपमा दिली होती. ठाकरे सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्यांना पोखरलं अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला होता. यावर प्रश्न विचारताच बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंची मानसिकता मनोरुग्ण असल्यासारखी आहे. कोणाला खेकडे म्हणणे योग्य नाही. उद्धव ठाकरेंना त्यांचे बोलणे लखलाभ, अशी टीका बावनकुळेंनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube