मोठी बातमी : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळणार, जरांगेंच्या मागणीला यश

Manoj Jarange - आता मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच उपोषण आंदोलन केले होते.

  • Written By: Published:
Manoj Jarange

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचा शासन निर्णय काढला आहे. आता मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे (OBC) सर्व शैक्षणिक सवलती मिळणार आहे. यासंंबंधीचा शासन निर्णय सरकारने शुक्रवारी काढला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नुकतेच उपोषण आंदोलन केले होते. या आंदोलनात ही मागणी होती. ही मागणी सरकारने त्वरीत मंजूर केल्याने जरांगे यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
हा शासन निर्णय यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून लागू होणार आहे.

14 तासांचा माणुसकीचा प्रवास! हरवलेले डेबिट कार्ड परत करण्यासाठी अनोळखी ‘कृष्णा’ धावत सुटला

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील उपोषण केले होते. 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे. जात पडताळणी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुढील 15 दिवसांत बैठक घेणे, न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार असून सातारा गॅझेटच्या प्रश्नावर सरकारला आणखी एक महिन्याचा अवधी देण्यात आला होते. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ओबीसीसारख्या शैक्षणिक सवलती देण्याची मागणी जरांगे यांनी आंदोलनात केली होती.


Maharashtra Sex Ratio : महाराष्ट्राला फक्त ‘मुलगा’ हवा आहे का? लिंग गुणोत्तरात मोठी घट; धक्कादायक आकडेवारी समोर

सवलत योजनांची अंमलबजावणी कशी होणार कुठे फायदा होणार?
राज्यातील इतर मागास प्रवर्ग प्रवर्गात लागू असलेली शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू होणार आहे. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी लागू असलेली मोटार वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना, नियोजन विभागाने सारखी संस्थेमार्फत राबविण्यात यावी. इतर मागासवर्ग प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागाने राबवावी. अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार आहे.

परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू होणार आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणि सवलती व सोयी सुविधा मिळविण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी, मराठा समाजातील विद्यार्थी देखील या शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असणार आहेत.

follow us