Maharashtra Sex Ratio : महाराष्ट्राला फक्त ‘मुलगा’ हवा आहे का? लिंग गुणोत्तरात मोठी घट; धक्कादायक आकडेवारी समोर

Maharashtra Sex Ratio : देशात महाराष्ट्राची गणना विकसित आणि आधुनिक राज्यांमध्ये केली जाते. तसेच राज्यातील नागरिकांची मानसिकता

Maharashtra Sex Ratio

Maharashtra Sex Ratio : देशात महाराष्ट्राची गणना विकसित आणि आधुनिक राज्यांमध्ये केली जाते. तसेच राज्यातील नागरिकांची मानसिकता आणि राहणीमानाचा दर्जा बदलत असल्याचा दावा देखील करण्यात येतो मात्र जन्मदराबाबतच्या नवीन सरकारी आकडेवारीने महाराष्ट्राची दुसरी बाजू समोर आणली आहे. एसआरएसच्या अहवालानुसार, 2020 ते 2022 दरम्यान राज्यातील मुलींच्या जन्माचे प्रमाण देशाती इतर राज्यातील तुलनेत कमी झाला आहे. या आकडेवारीनुसार, 2020 ते 2022 दरम्यान राज्यात दर 1 हजार मुलांमागे केवळ 899 मुलींचा जन्म झाला आहे. तर राष्ट्रीय सरासरी 918 इतकी आहे. विधानसभेत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

शहरी भागातील स्थिती खराब

या अहवालानुसार शहरी भागातील स्थिती ग्रामीण भागांपेक्षा खराब आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मागील दशकात 888 असलेले ग्रामीण लिंग गुणोत्तर सुधारुन आता दर 1 हजार मुलांमागे 910 इतके झाले आहे. तर मागील दशकात शहरी भागात हे गुणोत्तर 908 होते जे आता केवळ 885 इतके राहिले आहे.

केरळ आणि छत्तीसगड आघाडीवर

या अहवालानुसार, छत्तीसगड अव्वल स्थानावर असून तिथे दर 1 हजार मुलांच्या जन्मामागे 978 मुलींचा जन्म झाला आहे. तर केरळमध्ये दर 1 हजार मुलांमागे 974 मुलींचा जन्म झाला आहे. महाराष्ट्र केरळ आणि छत्तीसगड राज्य आर्थिकदृष्ट्या मागास मानली जाते मात्र या राज्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण जास्त आहे.

उत्तराखंडमधील परिस्थिती देशात सर्वाधिक गंभीर

तर दुसरीकडे उत्तराखंडमधील परिस्थिती देशात सर्वाधिक गंभीर असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. या राज्यात लिंग गुणोत्तर आता घसरुन केवळ 872 वर आले आहे. जे देशभरात सर्वात कमी आहे. तर हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तर 885 आणि देशाची राजधानी दिल्ली येथे लिंग गुणोत्तर 876 इतका आहे.

महाराष्ट्रात कमी होत असलेल्या लिंग गुणोत्तरावर बोलताना अर्थतज्ज्ञ डॉ. वंदना सोनलकर यांनी दावा केला आहे की, महाराष्ट्रातील हा कल आश्चर्यकारक नाही. जरी हे पूर्णपणे बेकायदेशीर असले तरी वास्तव असे आहे की अनेक डॉक्टरही या प्रक्रियेत थेट सहभागी असतात.

लहान कुटुंब, तरीही मुलाची इच्छा

राज्यातील लोक आता लहान कुटुंबांना पसंती देत आहेत. त्यामुळे एकूण प्रजनन दर 1.5 पर्यंत खाली आला असल्याची माहिती सरकारी अहवालांनुसार समोर आली आहे. या अहवालांनुसार, राज्यात सरासरी एक माता केवळ एक किंवा दोन मुलांना जन्म देत आहे. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हा दर 2.1  पर्यंत असणे आवश्यक आहे.

‘समर्थ पॅनल’ कडून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा

लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते, जेव्हा लोक कुटुंब लहान ठेवण्याची इच्छा बाळगतात पण ‘किमान एक मुलगा’ असावा यावर आग्रह धरतात, तेव्हा मुलींच्या जन्माचे प्रमाण वेगाने घटते.

follow us