Manoj Jarange Patil : ‘एकही गरीब मराठा वंचित राहणार नाही, पुन्हा मराठे आंदोलनाच्या पवित्र्यात, गप्प बसणार नाही…’

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या ताज्या जीआरचं (GR) स्वागत केलं, मात्र अजून काही महत्त्वाच्या मागण्या अपूर्ण असल्याने पुन्हा आंदोलनाची हाक द्यावी लागू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुन्हा मराठे आंदोलनाच्या पवित्र्यात?
जरांगे म्हणाले (Manoj Jarange Patil), आता आम्ही खुश झालो आहोत. आम्हाला आरक्षण मिळवलं आहे. सरकारने जीआर काढला, ही छोटी गोष्ट नाही. पण मराठा समाजातील गरीब बांधवांना मी सांगतो, हार-पुष्पगुच्छ, शाल आणून खर्च करू (Maratha Reservation Protest) नका. तो वायफळ खर्च थांबवून गरिबांना मदत करा. मला घरातील स्त्रिया कुंकू लावतील तरी पुरेसं आहे.
पुण्यात ‘देवाभाऊ’ म्हणत झळकलेल्या बॅनरांवरून विचारलं असता त्यांनी स्पष्ट केलं, कोणी बॅनर लावले तर आम्ही कौतुक करू. पण त्याच वेळी प्रमाणपत्र देण्याचं काम तातडीने व्हायला हवं. सरकारने कामं केली तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करू. मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात जाऊ.
ओबीसी मोर्चा
विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, कुणी काय बोलतो, गैरसमज पसरवतो त्याचं आम्हाला काही देणंघेणं नाही. सरकारने जीआर काढल्यानंतर आम्ही तो वकील आणि अभ्यासकांकडून तपासून घेतला. दुरुस्ती करावी लागते, हे स्वाभाविक आहे. नागपूरमधील ओबीसी मोर्चाबाबत जरांगे यांनी स्पष्ट केलं, आमचं त्यांच्याशी काही घेणंघेणं नाही. आम्ही सरकारशी भांडतो. जातीविरोधात लढण्याऐवजी स्वतःच्या जातीसाठी लढा, त्यातूनच तुमचं भलं होईल.
सरकारशी संवाद अन् पुढील दौरे
विखे पाटील यांच्याशी भेट झाली असून सरकारने सुधारित जीआर काढण्याचं आश्वासन दिलं आहे. कोणताही जीआर काढला तरी नंतर बदलावे लागतात, हे वास्तव आहे, असं त्यांनी सांगितलं.
आगामी दौऱ्यांबाबत त्यांनी माहिती देताना सांगितलं की, उद्या ते अंतवाली सराटी, नारायणगड आणि शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी जाणार आहेत. दसरा मेळाव्याबाबत विचारलं असता जरांगे म्हणाले, “दसरा मेळावा घेणं अवघड आहे. अशा मेळाव्याची तयारी एका महिन्यात होणं शक्य नसल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय.