Maratha Reservation Protest : फडणवीसांची क्षमायाचना योग्य पण… ; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

  • Written By: Published:
Maratha Reservation Protest : फडणवीसांची क्षमायाचना योग्य पण… ; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

जालना : मराठा आरक्षणाच्या (Jalna Maratha Reservation Protest) मुद्द्यावर उपोषण आणि आंदोलनाला बसलेल्यांवर पोलिसांकडून आमानुष माराहाण करण्यात आली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जखमींची माफी मागितली आहे. त्यावर आंदोलनाला बसलेल्या मनोज जरेंगेंनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी किमान माणुसकी म्हणून क्षमायाचना केली असेल तर, चांगली गोष्ट आहे. पण, माफी मागताना तुमच्या आईला आणि लेकरांना अमानुषपणे मारण्यात आले आहे. ज्याने ही मारहाण केली आहे. त्याला सक्तीच्या रजेवर न पाठवता कायमचं निलंबित करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. तसेच आमच्या मागण्यांवर चर्चेला येताना सरकारच्या शिष्टमंडळाने अध्येदेश घेऊन यावा, असे न झाल्यास उद्यापासून पाणी सुटलंच म्हणून समजा असा इशारा दिला आहे.

Jalna Maratha Protest : आरक्षण देणारचं! थोडा संयम ठेवा, केसेसही मागं घेणार; CM शिंदेंची ग्वाही

सरकारच्या पत्रकार परिषदेवर बोलताना जरांगेंनी सरकारने पहिले पाढे वाचण्याचे काम केले आहे.  नक्कीच यावर चर्चेने तोडगा निघेल यात काही दुमत नाही. पण, सरकारच्या शिष्टमंडळाने आमच्याशी चर्चेला येताना मराठा आरक्षणाचा अध्यदेश घेऊन यावा. त्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल. यावेळी जरांगेंनी आंदोलकांवर 307 सारखी कलमं लावण्यात आली आहे ती मागे घेण्याची मागणी केली.

Maratha Reservation : पोलिसांच्या कारवाईवर माफी मागण्याचा पहिलाच प्रसंग; पण फडणविसांची क्षमायाचना

अध्यादेश आला नाही तर…

यावेळी जरांगेंनी चर्चेसाठी दारं खुली केली म्हणजे पहिले पाढे बोलू नये. जर सरकारने मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल तर, येताना शिष्टमंडळाने तसा अध्यदेश घेऊन यावा. पण जर अध्यदेश आला नाही तर, उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा. मराठा समाज घाबरलेला नसून, समाजाला आरक्षण देईपर्यंत थांबणार नसल्याचे यावेळी जरांगेंनी यावेळी सांगितले. शिष्टमंडळ काय भूमिका घेऊन येतयं त्यावर गावकऱ्यांसोबत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असेही यावेळी जरांगेंनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube