सुनीता विल्यम्सच्या लँडिंगचे शेवटचे 45 मिनिटे भयानक का असतील, स्प्लॅशडाउन म्हणजे काय?

Why last 45 minutes of Sunita Williams’ landing : गेल्या नऊ महिन्यांपासून अवकाशात नासाचे (Nasa) अंतराळवीर अडकले होते. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. स्पेसएक्सचे अंतराळयान भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीकडे रवाना झाले आहे. त्याच्यासोबत त्याला आणण्यासाठी गेलेले आणखी दोन अंतराळवीर आहेत. भारतीय वेळेनुसार उद्या बुधवारी 19 मार्च रोजी सकाळी लवकर हे अंतराळयान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरण्याची शक्यता आहे. आज सकाळी हे अंतराळयान अनडॉक म्हणजेच अंतराळ स्थानकापासून वेगळं करण्यात आलंय.
बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी स्पेसएक्सच्या अंतराळयानातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. मागील वसंत ऋतूपासून त्यांचे घर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा निरोप घेतला. नासाच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं (Sunita Williams News) आहे की, जर हवामान अनुकूल असेल तर स्पेसएक्स यान फ्लोरिडा किनाऱ्यावरील पाण्यात उतरवलं जाणार आहे. यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी सात स्प्लॅशडाउन साइट्स ओळखल्या आहेत.
नगर हादरले! दहा कोटींसाठी व्यापाऱ्याचा खून; निलंबित पोलिसासह एकाला बेड्या
स्प्लॅशडाउन साइट्स म्हणजे काय?
जेव्हा एखादे अंतराळयान अवकाशातून पृथ्वीवर उतरते, तेव्हा ज्या ठिकाणी उतरते त्या ठिकाणाला (what is splashdown) स्प्लेशडाउन साइट म्हणतात. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे अंतराळयान पाण्यात उतरण्यात असल्याची माहिती मिळतेय. यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी सात स्प्लेशडाउन साइट्स निवडल्या आहेत. यापैकी तीन ठिकाणे मेक्सिकोच्या आखातात आहेत, ज्याचे नाव ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच अमेरिकेचे आखात असं केलंय. या ठिकाणांची ओळख अटलांटिक महासागरात झालीय.
या सातपैकी कोणत्या ठिकाणी स्पेसएक्स बुधवारी पहाटे उतरेल, हे जमिनीवरील शास्त्रज्ञ आणि स्पेसएक्सचे तज्ञ हवामानाच्या परिस्थितीनुसार ठरवतील. म्हणजेच, वातावरणातील आर्द्रता, तापमानाची परिस्थिती, वाऱ्याची दिशा आणि वेग या आधारे, शास्त्रज्ञ जागेवरच स्प्लॅशडाउन साइट निश्चित करतील. त्यामुळे, या सात स्प्लॅशडाउन साइट्सपैकी कोणत्या ठिकाणी हे अंतराळयान पाण्यात उतरेल, हे आत्ताच सांगता येत नाही.
राज्यातील बसस्थानकांबाबत मोठा निर्णय, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या महत्वाच्या सूचना…
शेवटचे 45 मिनिटे महत्वाचे का आहेत?
नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी स्पेसएक्सला शेवटचा मार्ग बदलावा लागेल. यानंतर, पृथ्वीच्या वातावरणातून जाण्यासाठी आणि स्प्लॅशडाउन साइटवर उतरण्यासाठी 46 मिनिटे लागतील. हे शेवटचे 46 मिनिटे खूप महत्वाचे आणि भयानक आहेत. कारण या काळात स्पेसएक्समध्ये घर्षणामुळे आगीचा गोळा तयार झाला असेल, ज्याचा वेग ताशी 28,000 किलोमीटर असेल. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच, त्याचा वेग हळूहळू कमी होऊ लागेल. कारण शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी एक बस्टर बसवला आहे, जो त्याचा वेग कमी करेल.
स्पेसएक्सचा वेग कसा कमी होईल?
शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर स्पेसएक्सचे कॅप्सूल आणि ट्रंक मॉड्यूल वेगळे होतील. चारही अंतराळवीर कॅप्सूलमध्ये असतील. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, या काळात कॅप्सूलचे तापमान देखील हळूहळू कमी होऊ लागेल. कॅप्सूलमध्ये उष्णता ढाल बसवण्यात आल्याने चारही अंतराळवीर सुरक्षित राहतील. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा हे कॅप्सूल त्याच्या प्रवासाच्या शेवटच्या सात मिनिटांत असते, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. त्यांच्या मते, घर्षणामुळे त्याचा वेग ताशी 600 किलोमीटरपर्यंत कमी होईल.