अजबच! अंतराळातून मतदान करणार सुनीता विलियम्स; NASA चा खास प्लॅन

अजबच! अंतराळातून मतदान करणार सुनीता विलियम्स; NASA चा खास प्लॅन

Sunita Williams : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर असलेले नासा वैज्ञानिक सुनीता विलियम्स आणि बूच विलमोर यांनी अंतरिक्षातूनच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खुलासा केला. सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी परतणार याची निश्चित माहिती नाही. अमेरिकेत तर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दोघेही अंतरिक्षातूनच मतदान करणार आहेत. दोघांनीही ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. तर नासाने या दोघांच्या मतदानासाठी खास प्लॅन तयार केला आहे. ज्यामुळे त्यांना मतदान करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

बोईंगच्या नव्या कॅप्सूलच्या मदतीने सुनीत विलियम्ससह आणखी दोघांना जमिनीवर अतिशय धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे नॅशनस एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (नासा) निर्णय घेतला आहे की या लोकांना पुढील वर्षात स्पेसएक्स यानाद्वारे आणण्यात येईल. या निर्णयामुळे सुनीता विलियम्सचा अंतराळातील मुक्काम बराच लांबला आहे.

‘इस्त्रायल धोक्यात येईल’, ‘पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील’ ट्रम्प अन् हॅरिस यांच्यात घमासान

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका साधारण नोव्हेंबर महिन्यात होतील अशी शक्यता आहे. तोपर्यंत सुनील विलियम्स आणि बाकीचे अंतराळ यात्री पृथ्वीवर येणार नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान करता येणे कठीण होईल. या गोष्टीचा विचार करून त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पृथ्वीपासून 400 किलोमीटर पेक्षा जास्त उंचावर आहे. हे स्टेशन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरते आणि एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास 90 मिनिटांचा वेळ घेते.

मतदानाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर बूच विलमोर म्हणाले, मी आजच माझे बॅलेट पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. हे महत्वाचे कर्तव्य आहे आणि नासा यात सर्वतोपरी मदत करत आहे. अंतराळातून मतदान करण्यासाठी मी अतिशय उत्सुक असल्याचे सुनीता विलियम्स म्हणाली. हे दोघ अंतराळ यात्री एलन मस्कच्या स्पेसएक्स कॅप्सूलच्या मदतीने पुढील वर्षी पृथ्वीवर येणार आहेत. आधीच्या व्यवस्थेत तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने त्यांचे पृथ्वीवर परतणे आणखी काही महिने लांबले आहे.

दोन्ही अंतराळ यात्री फेब्रुवारी 2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर राहतील. त्यानंतर स्पेसएक्सच्या मदतीने पृथ्वीवर येतील. त्यामुळे आता आणखी आठ महिने या लोकांना अंतराळातच काढावे लागणार आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच हे यात्री अंतराळात अडकले आहेत.

नव्या कॅप्सूलमध्ये थ्रस्ट प्रणाली बिघडली आहे तसेच हिलियम गळतीमुळे अंतराळ स्थानकापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर परतण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सुनीता विलियम्स आणि अन्य अंतराळ यात्रींचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग खडतर बनला आहे. आता आणखी आठ महिने त्यांना पृथ्वीवर परतणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube