भारताने अंतराळात रचला इतिहास! NISAR मिशन लाँच; पृथ्वीवर वॉच अन् संकटाआधीच करणार अलर्ट

NISAR Mission Launch : इस्त्रो आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा यांनी एकत्रितपणे तयार केलेले अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट निसार (NISAR Mission Launch) अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. आज सायंकाळी 5.40 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष केंद्रातून यशस्वीपणे लाँच करण्यात आले. या मिशनसाठी तब्बल दीड अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे. निसार (नासा-इसरो सिंथेटिक अपर्चर रडार) पृथ्वीवर घडणाऱ्या प्रत्येक हालाचालीची माहिती टिपणार आहे. यामुळे अनपेक्षितपणे येणाऱ्या नैसर्गिक संकटांची माहिती आधीच मिळणार आहे.
यी सॅटेलाइटचं वजन जवळपास 2 हजार 392 किलोग्रॅम आहे. याची लांबी 51.7 मीटर इतकी आहे. या सॅटेलाइटला GSLV-F16 रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात सोडण्यात आले. निसारला सूर्य समकालिक कक्षेत स्थापित केले जाणार आहे. येथूनच निसार पृथ्वीवरील प्रत्येक घडामोडींची माहिती टिपणार आहे.
GSLV-F16/NISAR
Liftoff
And we have liftoff! GSLV-F16 has successfully launched with NISAR onboard.Livestreaming Link: https://t.co/flWew2LhgQ
For more information:https://t.co/XkS3v3M32u #NISAR #GSLVF16 #ISRO #NASA
— ISRO (@isro) July 30, 2025
निसार अंतरळात काय करणार?
निसार सॅटेलाइट बारा दिवस पृ्थ्वीचा पृष्ठभाग आणि बर्फाच्या आवरणाने आच्छादित जमी स्कॅन करणार आहे. या व्यतिरिक्त स्वीपएसएआर टेक्निकचा वापर करुन 242 किलोमीटरच्या क्षेत्रात हाय रिजॉल्यूशन फोटो घेणार आहे. पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी याआधीही काही मिशन इस्त्रोने लाँच केले आहेत. परंतु, ते फक्त भारतीय क्षेत्रापर्यंतच मर्यादीत राहिले. परंतु, आता या निसार सॅटेलाइटचे उद्दीष्ट संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास करण्याचे आहे. या मिशनमुळे जगातील शास्त्रज्ञांना फायदा होणार आहे.
काय आहे NISAR, काय आहे खास..
NISAR नासा आणि इस्त्रोचे सिंथेटिक अपर्चर रडार आहे. निसार पहिलेच असे सॅटेलाइट रडार आहे जे अंतराळातून संपूर्ण पृथ्वीला मॅप करणार आहे. या माध्यमातून विविध प्रकारचे पर्यावरणीय आणि भू वैज्ञानिक घडामोडींची निगराणी करणार आहे. सध्या या सॅटेलाइटला लो अर्थ ऑर्बिटमध्येमध्ये ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी तीन वर्षांपर्यंत राहून निगराणी करणार आहे. हे सॅटेलाइट जमिनीच्या आतही मॅप करू शकते. बर्फाने आच्छादित जमीन, डोंगर आणि जंगलाच्या बाबतीतह माहिती देणार आहे. यामुळे ग्लेशियरचे वितळणे, भूस्खलन आणि ज्वालामुखी भूकंपाच्या घटनांत मदत करणार आहे.
ढगांच्या पलीकडच्या घडामोडी टिपणार
NISAR मध्ये सिंथेटिक अपर्चर रडार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ढगांच्या पलीकडच्या घडामोडीही टिपता येणार आहेत. अंधार असला तरी हाय रिजॉल्यूशनचे फोटो घेण्यास निसार सक्षम आहे. म्हणजेच या सॅटेलाइटच्या माध्यमातून पृथ्वीवर 24 तास नजर ठेवली जाणार आहे. या माध्यमातूनअंतराळातील अनेक घडामोडींची माहिती कळणार आहे.
मोठी बातमी! अमेरिका भारतावर २५% कर लादणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा