ISRO चे 101 वे मिशन फेल! PSLV रॉकेटने तिसरा टप्पा पार केलाच नाही; भल्या सकाळीच काय घडलं?

PSLV C61 Rocket Launched : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून इस्त्रोने (ISRO) आज सकाळी सहा वाजता पीएसएलवी सी61 रॉकेट लाँच केले होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे इस्त्रोचे हे मिशन अपयशी ठरले. PSLV रॉकेट तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. PSLV रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही. यातील सॅटेलाइट EOS-04 सारखेच होते. पृ्थ्वीची आधिक माहिती गोळा करणे तसेच फोटो पाठवण्याचे काम या सॅटेलाइटचे होते. महत्वाच्या कामांसाठी माहिती आवश्यक होती. ही माहिती या अभियानाच्या माध्यमातून गोळा करण्याचे इस्त्रोचे उद्दीष्ट होते. देशाच्या बॉर्डरवर होणाऱ्या हालचाली टिपण्याचेही काम या माध्यमातून होणार होते.
#WATCH श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश | इसरो ने सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से PSLV-C61 का प्रक्षेपण किया जो EOS-09 (पृथ्वी अवलोकन उपग्रह-09) को SSPO कक्षा में ले जाएगा। pic.twitter.com/OdsUhXtRV9
— ANI_HindiNews (@AHindinews) May 18, 2025
सॅटेलाइटची खासियत काय ?
पीएसएलव्ही रॉकेट EOS-09 ला सूर्य समकालिक कक्षा (Sun Synchronous Polar Orbit – SSPO) मध्ये घेऊन गेले. सी बँड सिंथेटिक अपर्चर रडार असलेले ईओएस 09 हवामानाच्या कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उच्च गुणवत्तेचे फोटो घेण्यास सक्षम होते. EOS 09 सॅटेलाइट देशाच्या रिपोर्ट सेंसिंग क्षमतेला आणखी बळकटी मिळवून देण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आले होते. याला दहशतवाद विरोधी मोहीम, घुसखोरी किंवा अन्य संशयास्पद हालचालींचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आले होते. याचे वजन 1710 किलो इतके होते.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्त्रोचा मास्टरप्लान सक्सेसफुल; पाकिस्तानला फोडला पुरता घाम
Today 101st launch was attempted, PSLV-C61 performance was normal till 2nd stage. Due to an observation in 3rd stage, the mission could not be accomplished.
— ISRO (@isro) May 18, 2025
इस्त्रोला मोठा धक्का
ISRO द्वारे EOS 09 (अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट 09) लाँचवर वैज्ञानिक डॉ. सेल्वमूर्ती यांनी भाष्य केलं होतं. ही सॅटेलाइट वैशिष्ट्यपूर्ण आहे. पृथ्वीवर नजर ठेवणाऱ्या अन्य सॅटेलाइट्सचाच हा भाग आहे. या ठिकाणी काय बदल होत आहेत यावर नजर ठेवली जाते. सॅटेलाइट जंगल, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षितता यांसारख्या मदत करील. देशाच्या बॉर्डरवरील हालचालीही या माध्यमातून टिपता येतील असे सेल्वमूर्ती म्हणाले होते. परंतु, आता हे मिशनच फेल झाल्याने इस्त्रोला मोठा धक्का बसला आहे.