राज्यातील बसस्थानकांबाबत मोठा निर्णय, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या महत्वाच्या सूचना…

राज्यातील बसस्थानकांबाबत मोठा निर्णय,  परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या महत्वाच्या सूचना…

Transport Minister Pratap Sarnaik On Bus Stands : मुंबई राज्यातील बसस्थानक (Bus Stand) अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी आणि अंबोली, या बसस्थानकांचा विकास तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) दिल्या.

विधानभवन येथे राज्यातील राज्य परिवहन विभागाच्या (Transport Minister) विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री दिपक केसरकर, आमदार चंद्रकांत सोनावणे, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख यावेळी उपस्थित होते.

मोठी बातमी! विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध ; अपक्ष उमेश म्हात्रेंचा अर्ज बाद

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, शहर,तालुका आणि ग्रामीण भागातील परिवहन व्यवस्था बळकटीकरणासाठी ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग अन् अंबोली ही बसस्थानक विकसित करण्यात येतील. यावेळी माजी मंत्री दिपक केसरकर यांनी अंबोली येथील बसस्थानक पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तेथे सर्व सुविधा युक्त नवीन बसस्थानक बांधण्यात यावे अशा सूचना केली .

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानक येथे वारंवार होत असलेले अपघात लक्षात घेता या बसस्थानक परिसरात रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, अशी येथील स्थानिकांची मागणी विचारात घेतली जावी, अशी सूचना माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. यावरती परिवहन मंत्री सरनाईक यांनी याबाबत लवकरच निर्णय घेऊन बसस्थानकात पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

अमेरिकन बँकेचा अंदाज खरा ठरला तर मुंबई-पुण्यात पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त; काय आहे नक्की धोरण?

जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक करण्यात यावे, याबाबतीत स्थानिक आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी सूचना केल्या. मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेला आदिवासीबहुल तालुका म्हणून चोपडा तालुका ओळखला जातो. या तालुक्यातील महत्वाचे बसस्थानक म्हणून चोपडा बसस्थानक अत्याधुनिक सोयीयुक्त बनविण्यात यावे, अशी मागणी केली. याबाबतीत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर चोपडा बसस्थानक विकसित करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube