तुकाराम मुंढेंच अन् आमदार खोपडेंमध्ये नेमकं काय बिघडलं?
कृष्णा खोपडे हे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. त्यांच्यावर आमदार खोपडेंकडून भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले जात आहेत
Krushna Khopde allegations against Tukaram Mundhe : सनदी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद नागपूरच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी नवा नाही, सत्ताधाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी जुळवूनच घ्यावे, अशी अपेक्षा सर्वसाधारणपणे लोकप्रतिनिधींची असते. अधिकारी तसे वागले नाही तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न केला जातो, त्यामुळे अधिकारीही सत्ताधाऱ्याशी वचकून असतात. एखाद्याच अधिकारी कर्तव्यकठोर असतो, सत्ताधाऱ्याना भीक घालत नाही. मग लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी असा संघर्ष सुरू होतो. अधिकारी बदलून गेला की तो ते.थेच संपुष्टात येतो. नागपुरात(Nagpur) मात्र यापे क्षा वेगळे घडले. चार वर्षापूर्वी येथून बदलून गेलेल्या अधिकाऱ्याचा मुद्या विधानसभेत गाजला. त्या अधिकाऱ्याचे नाव आहे तुकाराम मुंडे आणि मुद्या गाजवणारे आमदार आहेत भाजपचे कृष्णा खोपडे(Krushna Khopade). मतदारसंघात (पूर्व नागपूर) अनेक समस्या आहेत, पण त्याला प्राधान्य न देता खोपडें यांनी मुंडेचा मुद्या आक्रमकपणे मांडला, त्यामुळे खोपडेंच्या संतापाचे नेमके कारण काय ? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मागील आठवडाभरापासून आमदार कृष्णा खोपडे हे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे(Tukaram Munde) यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. त्यांच्यावर आमदार खोपडेंकडून भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले जात आहेत. यामागील राजकारण आणि कृष्णा खोपडे यांची दुखते नस काय आहे? तर मुंडे तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची “स्मार्ट सिटी प्रकल्प”चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला होता. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी कृष्णा खोपडे यांनी केली होती. खरोखर या आरोपांमध्ये तथ्य आहे का? कृष्ण खोपडे यांनी केलेल्या 20 कोटींच्या आरोपांमध्ये काही गोष्टींत तथ्य आहे.
ट्रम्प आणि मोदींचा फोन झाला…व्यापार करारावर गोड बातमी येण्याची शक्यता!
तुकाराम मुंडे नागपूर पालिकेचे आयुक्त झाले तेव्हा सोनू नेहूल नावाचे अधिकारी त्या पदावरून बदली झाली. तत्कालीन नगरविकास विभागाचे सचिव प्रवीणसिंह परदेशी पदभार स्वीकारण्याची सूचना दिल्या. जानेवारी 2020 मध्ये हि नियुक्ती झाली होती. फोनवरून दिलेले आदेश गैरप्रकार नाही. कोव्हीड सुरू असल्याने घरून काम सुरू होत. पूर्ण काम झालेलं होत त्याचंच बिल दिलेलं होत. आधीच्याच कंत्राटदार होता त्याला बिल दिली. प्रत्येक विभागामधील कॅफो ची सही या बिलांवर होती. पोलिसांनी 2020 मधेच अशी तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता. सरकारने देखील असा आदेश काढला होता की तुकाराम मुंडे यांनी सरकारच्या सांगण्यावरूनच कारभार स्वीकारला आणि बिलं काढली. हे कृष्णा खोपडे यांना देखील माहित आहे. तुकाराम मुंडे यांच्यावर छळाची तक्रार देखील झाली होती. मात्र हि तक्रार खोटी असून त्या संबंधित महिलांना दंड देखील ठोठावण्यात आला होता. तुकाराम मुंडे यांच्या समर्थकांनी मला फोन करून धाकी दिली असलत्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला होता. सरकारने देखील लेखी कळवळा होतं की त्यांनी केलेलं आरोपांमध्ये तथ्य नाही.
कृष्णा खोपडे यांच्या मेहुण्याच्या नोकरी गेली असल्याच्या घटनेला तुकाराम मुंडे जबाबदार असल्याचा राग मनात धरून हे सगळं करत असल्याची शक्यता आहे. बोगस नोकरभरतीत मेहुण्याच्या नोकरी गेल्याने त्याचा राग ते काढत असल्याचा राग मनात धरून हे आरोप केले जात आहेत. बेकायदा नियुक्ती असल्याने तुकाराम मुंडे यांनी त्यांना पदावर मुक्त केलं होत. त्याचाच राग मनात धरून हे सगळं केलं जात आहे.
