मड्याच्या टाळूवरचे लोणी खाल्लेल्यांनी अमित शहांवर बोलू नये; ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचं प्रत्युत्तर
Eknath Shinde यांनी अमित शहांवर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलयं
Eknath Shinde Answered to Udhhav Thackery for Criticism on Amit Shah : राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शहा यांना घेरल्याचं पाहायला मिळालं ‘शहा यांनी आपल्याला हिंदुत्व शिकवू नये‘. अशी टीका त्यांनी केली. यावर आता शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलयं
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
काही लोक आरायवल आणि डीपरचरसाठीच आहेत. त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. त्यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. Rss देशभक्त संघटना आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली मुंबईची तिजोरी धुतली. कोरोनामध्ये रुग्णांच्या तोंडची खिचडी खाल्ली , मिठी नदीचा गाळ खाल्ला , मड्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले अशांनी अमित शहांवर बोलू नये. असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
अरे भाई केहना क्या चाहते हो, अमित शहा मोठे मंत्री आहेत. शहा, भाजप ने मला हिंदुत्व शिकवू नये.एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावर वाद कसा होऊ शकतो. वंदे मातरम् वर कशी चर्चा होऊ शकते. गो मांस खाणारे मंत्री यांच्या मंत्री मंडळात आहे. अमित शहा यांनी त्यांना काढून दाखवलं पाहिजे. RSS च्या पार्किंगसाठी मंदिर पाडलं. पालघर साधू हत्या कांड मधील व्यक्तीला यांनी भाजपा घेतलं.. माझ्यावर तेव्हा आगपाखड केली. आता तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? असा सवाल ठाकरे यांनी केला होता.
