ट्रम्प आणि मोदींचा फोन झाला…व्यापार करारावर गोड बातमी येण्याची शक्यता!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा; पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती.
Prime Minister Narendra Modi speaks to Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेसंदर्भातील माहिती पंतप्रधान मोदींनी(PM Narendra Modi) त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. पंतप्रधानांनीआज डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत-अमेरिका(India-America) सर्वसामावेशक प्रादेशिक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य सातत्यानं मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भारत आणि अमेरिका एकत्रितपणे जागतिक शांतता, स्थैर्य आणि संपन्नतेसाठी कार्य करत राहतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
मड्याच्या टाळूवरचे लोणी खाल्लेल्यांनी अमित शहांवर बोलू नये; ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचं प्रत्युत्तर
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं शिष्टमंडळ नवी दिल्लीत कराराला अंतिम स्वरूप देण्यासंदर्भात चर्चा करत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली आहे. ट्रम्प यांची अलीकडच्या काळातील वक्तव्य पहिली तर भारत आणि अमेरिकेतील व्यापारी कराराला अंतिम स्वरूप मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जैमिसन ग्रीर यांनी भारतानं अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात चांगला प्रस्ताव दिला आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये सिनेटच्या एका उपसमितीच्या बैठकीत त्यांनी म्हटलं की अमेरिकेन व्यापार पथक सध्या भारतात आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित अडचणींबाबत चर्चा करत आहे.
