नागपूर हिंसाचारातील समाज कंटकांबाबत पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती

नागपूर हिंसाचारातील  समाज कंटकांबाबत पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती

information from Police Commissioner regarding Nagpur violence : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या कबरीवरून वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली, इतकंच नाही तर पोलिसांवर थेट दगडांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी (Nagpur Violence) झालेत. दोन्ही गटांकडून दगडांचा मारा थांबतच नव्हता. यावर आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यावर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.

मैत्रिण नाही पण सुनिता परतली! कल्पना च्यावलाच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी सुनिता विल्यम्स येणार पृथ्वीवर

रवींद्र कुमार सिंगल म्हटले आहेत की, नागपूरची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे समाजकंटक हे स्थानिकच होते त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकवण्याचे काम केलं. तसेच नागपूर मध्ये ज्या पद्धतीने घटना घडत गेल्याने हिंसाचार झाला त्यामध्ये कोणीही बाहेरून आल्याचे पुरावे मिळालेले नाही. तसेच या प्रकरणावर अद्याप देखील कारवाई सुरू असून ज्यांची ओळख पटत आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. अशी माहीती त्यांनी दिली.

‘2 वर्षांत 52 वेळा दुबईला… सकाळी जायची अन् संध्याकाळी’; DRI ने केला रान्या रावच्या सोनं तस्करीच्या संपूर्ण खेळाचा पर्दाफाश

दरम्यान हे दगड नेमके कुठून येत होते? हा हल्ला पूर्वनियोजित तर नव्हता ना, असे सवाल निर्माण होत आहेत. यावर आता नागपूर पोलिसांनीच कालच्या घटनेसंदर्भात मोठा खुलासा केलाय. नागपूर शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुरानं अचानक वेढलं. दोन्ही बाजूंच्या जमावाकडून घोषणाबाजी आणि विटांचा जीवघेणा मारा सुरु होता. या हल्ल्यात तीसहून अधिक पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती (Nagpur News) मिळतेय. या हल्ल्याला पार्श्वभूमी सोमवारी निघालेल्या औरंगजेबा कबर हटविण्याचा मागणी करणाऱ्या मोर्चाची होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube