मैत्रिण नाही पण सुनिता परतली! कल्पना च्यावलाच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी सुनिता विल्यम्स येणार पृथ्वीवर

Sunita Williams will come to earth Two day after Kalpana Chaywala’s birthday : गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांची अखेर पृथ्वीवर वापसी होत आहे. बुधवारी पहाटे सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतील अशी माहिती आहे. सुनिता विल्यम्स पृथ्वीवर येणार तो दिवस देखील खास आहे कारण तिची मैत्रीण आणि रॉकेट अपघातात निधन झालेली अंतराळवीर कल्पना चावलाच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी पृथ्वीवर परतणार आहे त्यामुळे मैत्रीण नाही पण सुनिता वाचली असंच म्हणावं लागेल.
आठ दिवसांच्या अगदी लहान अंतराळ मोहिमेसाठी सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर अंतराळात गेले होते. परंतु नऊ महिने उलटले तरी देखील हे यात्री पृथ्वीवर परतलेले नाहीत. तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा अंतराळातील मुक्काम वाढतच गेला. दरम्यान सुनिता विल्यम्स आणि कल्पना चावला या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या भारतीय वंशाच्या असल्याने त्यांच्या भारतीय गोष्टींच्या आणि पदार्थांच्या बाबतीतील आवडीनिवडीत देखील सारख्याच होत्या. याबाबत बोलताना एकदा सुनीताने म्हटले होते की, मी माझ्या पहिल्या मिशनवर जात आहे मात्र यामध्ये माझी मैत्रीण सोबत नाही.
VIDEO : पृथ्वीवर परण्यापूर्वीचा सुनीता विल्यम्सचा अंतराळ स्थानकावरील शेवटचा फोटो समोर, काही तासांतच…
कल्पना चावला बद्दल सांगायचे झाले तर तुझा जन्म 17 मार्च 1962 रोजी भारतातील हरियाणा मधील करणार या ठिकाणी झाला होता बनारसी लाल चावला असं तिच्या वडिलांचे नाव होतं. तर कल्पनाने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करून एस्ट्रोनॉट होण्याचे ठरवलं. ज्यावेळी कल्पना चा अपघात झाला त्यावेळी तिच्या शाळेचे संचालक म्हटले होते. किती एक साधी मुलगी नव्हती की, जिला लग्न करून सेट व्हायचं ती काहीशी बंडखोर होती.
अभिनेत्री हेमामालिनी यांच्या जगन्नाथ पुरी मंदिराच्या भेटीवरून वाद! पण नेमकं कारण काय?
शाळेच्या भूगोलाच्या प्रोजेक्टमध्ये देखील तिने अवकाशातील ग्रह तारे वृत्तपत्राच्या सहाय्याने बनवले होते. तर इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर तिने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला ज्या ठिकाणी तिने तिचे पदविका आणि पीएचडी केली. यातूनच तिथेच नासामध्ये दाखल झाली. या ठिकाणी ती व्हॉइस प्रेसिडेंट आणि रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम बघत होते. याचवेळी 1997 मध्ये कल्पना चावला ही अंतराळामध्ये जाणारी पहिली भारतीय महिला ठरली. मात्र कोलंबिया शटल दुर्घटनेट कल्पना चावलाचं निधन झालं.
त्यानंतर आता याच कल्पनाची नासामधील भारतीय वंशाचीच सुनिता विल्यम्स ही देखील कल्पनाच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी सुनिता पृथ्वीवर परतणार आहे. सकाळी साडेदहा वाजता आयएसएसवरून (Sunita William News) अनडॉक केलंय. त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा 17 तासांचा प्रवास सुरू आहे. हे अंतराळयान बुधवारी पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी अमेरिकन राज्य फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरून खाली उतरेल.