मनाच्या अत्यंत जवळची गोष्ट… वाढदिवसानिमित्त अमृताची खास पोस्ट,पण चाहत्यांना पडला वेगळाच प्रश्न
Amruta Khanvilkar ने तिच्या वादिवसाच्या निमित्तानं सोशल मीडिया वर एक स्पेशल पोस्ट करून चाहत्यांना कोड्यात पाडलं आहे.
Amruta Khanvilkar Special Post on her Birthday but Fans have questioned : सिने विश्वात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. फॅशन, नृत्य आणि दर्जेदार अभिनयाने आजवर अमृताने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आणि तिने तिच्या वादिवसाच्या निमित्तानं सोशल मीडिया वर एक स्पेशल पोस्ट करून चाहत्यांना कोड्यात पाडल आहे. अमृताच्या पोस्ट ने आता ती काय नवीन घेऊन येणार हे बघणं तर उत्सुकतेचे ठरणार आहे.
जमीन घोटाळ्यांची मालिका! मुंढवा, बोपोडीनंतर बाणेर 900 कोटींच्या जमीन प्रकरणातही शितल तेजवानीचं नाव
आजवरच्या तिच्या प्रत्येक कलाकृती ने तिने जगभरात प्रेक्षकांना मोहित केलं आहे. अभिनयाच्या सोबतीने अमृताने तिच्या फॅशन स्टेटमेंटने देखील इंडस्ट्रीत एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून नाव संपादन केलं आहे. अमृताच्या या बर्थडे पोस्ट ने आता प्रेक्षकांना एक वेगळा प्रश्न पडला असून ती काही नवीन प्रोजेक्ट करणार का ? नव्या वर्षात ती कोणत्या रूपात बघायला मिळणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी रात्री उशीरा पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक
अमृताने वाढदिवशी सोशल मीडिया वर खास पोस्ट लिहिली आहे ती म्हणते ” तुमच्या सगळ्या प्रेमासाठी खूप आभार ! नव्या वर्षात मी खूप कृतज्ञ पूर्ण पणे पाऊल टाकत आहे. नवी स्वप्न नवी ऊर्जा घेऊन ” अमुल्य बाय अमृता ” हे नवा प्रवास सुरू करतेय कारण 2026 मध्ये माझ्या मनाच्या अगदी जळवची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येणार आहे” तिच्या या सस्पेन्स पोस्टने आता सिनेविश्वात देखील चर्चा होताना दिसतात आणि प्रेक्षकांना या पोस्टमुळे 2026 मध्ये काय नवीन बघायला मिळणार या साठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
