चॅटजीपीटीचा गजब दावा! वडिलांनाच म्हटलं स्वतःच्या मुलांचा खुनी, 21 वर्षांची शिक्षाही…OpenAI विरोधात खटला

चॅटजीपीटीचा गजब दावा! वडिलांनाच म्हटलं स्वतःच्या मुलांचा खुनी, 21 वर्षांची शिक्षाही…OpenAI विरोधात खटला

Chatgpt False Claims Norwegian Man Case Against OpenAI : आजकाल चॅटजीपीटीचा (Chatgpt) वापर वाढला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एआयची मदत घेतोय. परंतु याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोर्वेच्या एका व्यक्तीने चॅटजीपीटी तयार करणाऱ्या ओपनएआय कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केलीय. एका प्रश्नाच्या उत्तरात, चॅटजीपीटीने त्याला त्याच्या स्वतःच्या दोन मुलांचा (OpenAI) खुनी घोषित केल्याचा आरोप त्याने केलाय. एवढेच नाही तर या चॅटबॉटने त्यात आणखी एक ट्विस्ट देखील जोडलाय. ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला होता, त्याला या खुनांसाठी आधीच शिक्षा झालीय. तो 21 वर्षांपासून तुरुंगात असं देखील म्हटलं आहे.

तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘अर्वे हल्मार होलमेन’ आहे. तो म्हणाला की, तो नॉर्वेचा एक सामान्य माणूस आहे, प्रसिद्ध व्यक्ती नाही. एके दिवशी त्याने चॅटजीपीटीला स्वतःबद्दल माहिती विचारली. त्याने ‘अर्वे हजलमार होल्मेन कोण आहे?’ असा प्रश्न विचारला होता. यावर चॅटबॉटने उत्तर दिलं की, अर्वे हल्मार होलमेन हा नॉर्वेजियन आहे. त्याला दोन मुलं होते. पहिला मुलगा दहा वर्षांचा आणि दुसरा सात वर्षांचा आहे. डिसेंबर 2020 मध्ये नॉर्वेच्या ट्रॉन्डहाइम येथे त्यांच्या घराजवळील एका तलावात दोन्ही मुले मृतावस्थेत आढळली.

Sanskruti Balgude : चंदेरी साडीत मादक अदा, संस्कृती बालगुडेचं घायाळ करणारं सौंदर्य

चॅटजीपीटीने आपल्या उत्तरात पुढे लिहिलंय की, या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. होल्मनला त्याच्या दोन्ही मुलांच्या हत्येप्रकरणी 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. द गार्डियनच्या वृत्तानुसार , अर्वेने ‘डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी’कडे तक्रार दाखल केली आहे. त्याने चॅटजीपीटीच्या या वृत्तीचे वर्णन धोकादायक असल्याचे म्हटले आहे. चॅटजीपीटीने अर्वेच्या वैयक्तिक डेटाचा वापर त्याच्याबद्दल काही माहिती गोळा करण्यासाठी केलाय. नंतर त्याचे भयानक कथेत रूपांतर केले.

जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा, कारण काय? पवारांनी स्पष्टच सांगितलं

अर्वे म्हणतो की, चॅटजीपीटीने त्याच्या शहराचे नाव बरोबर सांगितले. त्याने बरोबर सांगितले की त्याला दोन मुले आहेत आणि ती किती वर्षांची आहेत. तो म्हणाला की, त्याच्यावर कधीही कोणत्याही गुन्ह्याचा आरोप नव्हता, मग त्याला दोषी कसे ठरवता येईल. तक्रारीत म्हटलंय की, चॅटबोटचं उत्तर अस्वस्थ करणारं आहे. कारण जर ही गोष्ट त्यांच्या समाजात किंवा शहरातील कोणालाही कळली तर त्याचा त्याच्या वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

तक्रारदाराने ओपनएआयला ही चुकीची माहिती काढून टाकण्याची विनंती केली आहे. यासोबतच कंपनीवर दंड आकारण्याची मागणीही करण्यात आलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube