गुगल क्रोमला धोक्याची घंटा; एआय जगतात GPT-5 अन् वेब ब्राउजर लवकरच घेणार एन्ट्री !

Open AI New GPT 5 Model : जागतिक एआय शर्यतीत डीपसीक (DeepSeek) सारख्या चिनी कंपन्या वेगाने उदयास येत असताना ओपनएआय (OpenAI) चे सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी आता मोठा डाव टाकण्याची तयारी केली आहे. वृत्तानुसार ओपनएआयचे सर्वात प्रगत एआय (AI) मॉडेल जीपीटी-5 (GPT-5) या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या सोबतच एक वेब ब्राउजर देखील लाँच केले जाणार आहे. थेट गुगल क्रोमची मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्लॅन कंपनीने आखल्याचे दिसत आहे.
एआय जगतातील पुढील क्रांती
टेक वेबसाइट ‘द व्हर्ज’ च्या अहवालानुसार जीपीटी-5 लवकरच लाँच केले जाऊ शकते. ते जीपीटी-4 पेक्षा प्रचंड हुशार, वेगवान आणि अधिक स्मार्ट असेल. GPT-5 बनवण्यासाठी नवीन संशोधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे नवीन तंत्रज्ञान जीपीटी-5 ला आणखी मजबूत बनवणारे आहे.
जीपीटी-5 ची आवृत्ती मोफत?
सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सॅम ऑल्टमन सर्वांना जीपीटी-5 ची मोफत देण्याची योजना आखत आहेत. त्यांनी सांगितले आहे की, “जर प्रत्येक व्यक्तीला जीपीटी-5 ची मोफत दिले गेले तर काय होईल, जी त्यांच्यासाठी नेहमीच काम करते. यामुळे जगभरात एआयची पोहोच आणखी वाढू शकते”.
तुमचे पैसे धोक्यात ? ‘हा’ नवीन मालवेअर थेट चोरतो आहे बँकिंगचे डिटेल्स
ओपनएआयच्या धोरणात बदल
ओपनएआयने आधीच घोषणा केली आहे की एआय मॉडेल टप्प्याटप्प्याने रिलीज केले जातील. यामध्ये, ‘ओ3 आर’ ओ4-मिनी (‘o3 R’ o4-mini) सारखे मध्यमस्तरीय मॉडेल्स प्रथम सादर केले जातील. जेणेकरून वापरकर्त्यांना नवनवीन वैशिष्ट्यांची सवय होईल.
गुगल क्रोमशी स्पर्धा
फक्त जीपीटी-5 च नाही तर ओपनएआय आता एआय सुसज्ज वेब ब्राउझर देखील लाँच करणार आहे. हे थेट गुगल क्रोमला (Google Chrome) आव्हान देणारं असेल. याशिवाय कंपनीने अलीकडेच चॅटजीपीटी एजंट देखील लाँच केले आहे जे तुमच्या संगणकावर अनेक कामे स्वतःहून पूर्ण करू शकते. जसे की, फाइल उघडणे, मेल पाठवणे किंवा डेस्कटॉपवर शोध घेणे.
जीपीटी-5 चे आगमन आय (AI) जगतात एक नवीन वळण आणू शकते. चीनच्या डीपसीक (DeepSeek) सारख्या कंपन्या वेगाने पुढे जात असताना ओपनएआय जीपीटी-5 (OpenAI GPT-5) द्वारे तंत्रज्ञान क्षेत्रात पुन्हा नेतृत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण आता ऑगस्ट 2025 ची वाट पाहत आहे.
जगभरातील लोक चॅटजीपीटीचे वेडे, दररोज विचारले जात आहेत 250 कोटी प्रश्न!