तुमचे पैसे धोक्यात ? ‘हा’ नवीन मालवेअर थेट चोरतो आहे बँकिंगचे डिटेल्स

this new malware is stealing your banking details your money is in risk: एक नवीन मालवेअर समोर आला आहे. हा मालवेअर बँकिंग तपशील चोरण्यासाठी विंडोज फीचरचा वापर करतो. या मालवेअरचे नाव ‘कोयोट’ आहे. सायबरसुरक्षा फर्म अकामाई (Akamai) च्या संशोधकांना असे आढळून आले आहे की, हा मालवेअर वापरकर्ता कोणत्या क्रिप्टोकरन्सी आणि एक्सचेंज वेबसाइट्समध्ये प्रवेश करत आहे हे समजून घेण्यासाठी यूआई (UI) ऑटोमेशन फ्रेमवर्क नावाच्या विंडोज फीचरचा वापर करतो. ही माहिती समजल्यानंतर, हा मालवेअर वॉलेट आणि बँकिंग तपशील चोरतो. कोयोट मालवेअर बँकिंग तपशील चोरण्यासाठी लॉगिंग, फिशिंग ओव्हरले आणि स्क्विरल इंस्टॉलर्स सारख्या विविध तंत्रांचा वापर करतो.
माझं गुलाबी गप्पांचं वय नाही, पण तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्या… महाजनांवर टीका, खडसेंची जीभ घसरली
सायबर सुरक्षा संशोधकांनी सांगितले की, हा मालवेअर वापरकर्त्याचे नाव, संगणकाचे नाव, सिस्टम तपशील आणि तुम्ही वापरत असलेल्या आर्थिक सेवांबद्दल तपशीलवार माहिती त्याच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला पाठवतो. त्यानंतर मालवेअर सक्रिय विंडोचे नियंत्रण घेण्यासाठी GetForegroundWindow() नावाच्या विंडोज API चा वापर करतो आणि त्याची तुलना बँकिंग साइट्स आणि क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसच्या हार्डकोडेड सूचीशी करतो.
PM मोदींची ऐतिहासिक झेप! इंदिरा गांधींचा विक्रम पार केला, सर्वात जास्त काळ सत्तेवर…
हा मालवेअर सध्या ब्राझीलमधील लोकांना लक्ष्य करत आहे. परंतू संशोधकांचे असे म्हणणे आहे की, सायबर गुन्हेगार नवीन मालवेअर जगभरात पसरवण्यापूर्वी त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी एका प्रदेशात त्याची चाचणी घेतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, हा मालवेअर जगभरातील इतर देशांमध्ये सहजपणे पसरू शकते आणि सर्व वापरकर्त्यांना आपले लक्ष्य बनवू शकतो.
मालवेअरचा धोका कसा टाळवा?
तुमची ऑपरेटिंग सिस्टम आणि इतर सर्व सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा. अपडेट्समध्ये अनेकदा सुरक्षा पॅचेस असतात,जे मालवेअर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. एक विश्वासार्ह अँटीव्हायरस वापरा. तो अँटीव्हायरस नेहमी सिस्टममध्ये सक्रिय ठेवा. तो नियमितपणे अपडेट करा आणि तुमची सिस्टम स्कॅन करत रहा. कोणत्याही अज्ञात ईमेल किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका. तसेच अज्ञात ईमेल अटॅचमेंट उघडू नका.