Asrani | ‘हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं’ म्हणणाऱ्या कॉमेडी किंगचा प्रेरणादायी प्रवास

Govardhan Asrani – ‘शोले’च्या जेलरपासून ते बॉलीवूडच्या हास्यबादशाहपर्यंतचा प्रवास!

Asrani

बॉलीवूडच्या विनोदी अभिनयाच्या इतिहासात जर एखादं नाव कायमचं कोरलं गेलं असेल, तर ते म्हणजे गोवर्धन असरानी. असरानी यांचं ( दि.२० नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजता निधन झालं. दीर्घकाळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या कलाकाराचा प्रवास प्रेरणादायी आहे.

Asrani- अहमदाबादचा साधा मुलगा ते बॉलीवूडचा स्टार

१ जानेवारी १९४१ रोजी जयपूर (राजस्थान) येथे जन्मलेले Asrani यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याच्या Film and Television Institute of India (FTII) मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. इथूनच त्यांच्या सिनेमातील प्रवासाला खरी सुरुवात झाली.
१९६७ मध्ये ‘हरे कांच की चूड़ियाँ’ या चित्रपटातून असरानी यांनी छोट्या भूमिकेतून पदार्पण केलं. पण त्यांच्या चेहऱ्यावरील सहज भाव, संवादातील टायमिंग आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे ते लवकरच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.

कसदार अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन

७० च्या दशकातील कॉमेडीचा पर्याय

‘शोले’, ‘चितचोर’, ‘अभिमान’, ‘अमिताभ’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत Asrani यांनी दिलेली कामगिरी आजही स्मरणीय आहे.
‘शोले’ (१९७५) मधील “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं!” हा त्यांचा संवाद आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. असरानींच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचं, पण त्यांच्या अभिनयात भावनिक खोली देखील होती. त्यांनी केवळ कॉमेडीच नव्हे तर गंभीर आणि हृदयस्पर्शी भूमिका देखील अप्रतिम साकारल्या. संवादातील चढउतार, हावभाव आणि डोळ्यांतून भावना व्यक्त करण्याची त्यांची शैलीच त्यांचा USP ठरली.

History of Fireworks | फटाक्यांचा शोध कुणी लावला आणि सर्वप्रथम फटाके कुठे आणि कधी वाजला ? वाचा सविस्तर..As

अजरामर भूमिका आणि लोकप्रियता

‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘चलती का नाम गाडी’, ‘अभिमान’, ‘जय संतोषी माँ’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘हेरा फेरी’, ‘हलचल’ अशा असंख्य चित्रपटांत असरानींच्या भूमिका आजही प्रेक्षकांना आठवतात. फक्त चित्रपटच नव्हे तर ‘भाभी जी घर पर हैं’ आणि ‘हास्यचक्र’सारख्या टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी नव्या पिढीवर छाप सोडली.

Asrani यांचे सन्मान आणि पुरस्कार
१९७५ साली ‘आज की ताज़ा खबर’ या चित्रपटासाठी असरानी यांना Filmfare Award for Best Comedian मिळाला, तर १९९४ मध्ये Filmfare Lifetime Achievement Award ने त्यांचा गौरव करण्यात आला. बॉलीवूडमधील सातत्य राखणाऱ्या विनोदी कलाकारांमध्ये असरानींचं नाव अग्रगण्य आहे.

follow us