माझं गुलाबी गप्पांचं वय नाही, पण तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्या… महाजनांवर टीका, खडसेंची जीभ घसरली

माझं गुलाबी गप्पांचं वय नाही, पण तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्या… महाजनांवर टीका, खडसेंची जीभ घसरली

Eknath Khadase Criticize Girish Mahajan on photo with Praful Lodha : जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांना पोक्सो अंतर्गत अटक झाली आहे. त्यानंतर त्यांचे मंत्री गिरीश महाजनांशी (Girish Mahajan) संबंध असून महाजनांची देखील चौकशी केली जावी. तसेच यामध्ये हनीट्रॅपचे देखील कनेक्शन असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी केले होते. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचाच प्रफुल लोढासोबतचा फोटो पोस्ट करत पलटवार केला होता. त्याला आता खडसेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपांची झोड उठवत आपली खदखद व्यक्त केली. प्रफुल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसेंनी सांगितले की, “हो, लोढा माझ्याशी बोलत होता. पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे, तर माझ्याबद्दलच तो मला सांगत होता.”

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाचं सहकार्य; अभ्यासक्रम पुरवण्याचं मंत्री शेलारांचं अश्वासन

खडसे (Eknath Khadase) म्हणाले की, “गुलाबी गप्पा करण्याचं वय आता माझं राहिलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी महाजनांच्या विधानावर खोचक प्रत्युत्तर दिलं. त्यांनी महाजनांवर आरोप करत सांगितले की, “तुम्ही लोढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्यामुळे मला माहिती मिळाली नाही.”

Kalyan Crime : रमीच्या नशेत चोरीचा गेम! धावत्या ट्रेनमधील महिलांचे दागिने लांबविले…

तसेच, खडसे (Eknath Khadase) यांनी महाजन यांच्यावर वैयक्तिक टीकाही करत, “तुम्ही फडणवीसांमुळे आहात, अन्यथा तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्याइतकी देखील राहिली नसती,” अशी जहरी टीका केली. “माझ्या पाच चौकशा झाल्या, तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी, एवढा दम आहे का?”, असा सवालही खडसेंनी थेट विचारला.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! वर्षातून एकदा मिळणार महिनाभर रजा

भाजपामधील आपला प्रवास आणि त्यांना झालेल्या अन्यायावरही खडसे (Eknath Khadase) भावनिक झाले. “मी पक्षासाठी आयुष्य खर्च केलं, पण आज आरोप सिद्ध होऊनही काहीजण पक्षात आहेत, आणि आम्ही बाहेर फेकले गेलो,” असं म्हणत त्यांनी मनातील वेदना व्यक्त केल्या. “महाजन यांनी मला मंत्रीमंडळातून दूर ठेवण्यासाठी षड्यंत्र रचले आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला.” “जोपर्यंत मी मंत्रिमंडळात होतो, तोपर्यंत महाजनांचं वर्चस्व शक्य नव्हतं, म्हणूनच हे सर्व घडलं, असेही खडसे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

प्रफुल्ल लोढा हा अगोदर एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि इतर राजकारण्यांशी संबंध आले. त्यातून तो 50-60 कोटींचा मालक झाला आहे. मात्र बराच काळ एकत्र राहिल्यानंतर महाजन आणि लोढामध्ये दुरावा आला. तेव्हा लोढांनी महाजनांना खालच्या भाषेत टीका करत होते. त्यावेळी लोढा यांचे व्हिडीओ समोर आले होते. त्यात ते म्हणाले की, मला ब्लॅकमेल करू नका नाही. तर मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल कलेली आहेच पण जर मी एक बटण दाबलं तर सगळं समोर येईल. तसेच ट्रायडंट हॉटेलला तुम्ही माझे कसे पाय चाटत होते हे मी सगळ्या जगाला सांगेल. त्यानंतर लोढाला भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. त्यामुळे जर लोढा आणि महाजन यांच्यामध्ये आता एवढी जवळीक कशी काय निर्माण झाली. त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी काय आली? हे सर्व पैसे लोढाला ब्लॅकमेलिंगमधून मिळाले का? याची चौकशी व्हायल हवी. अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

VIDEO : ‘मराठीला अभिजात दर्जा कशाला हवा? ‘ केतकी चितळेचा सवाल, सोशल मीडियावर संताप…

आता त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एक गुन्हा पोक्सो अंतर्गत आहे. तसेच त्याला अटक झाली आहे. अशा माणसाला भाजपमध्ये घेणे तेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे कितपत योग्य आहे. त्यामुळे हनी ट्रॅपिंगचं जे प्रकरणं समोर आलं आहे. ते अधिकाऱ्यांचं नसून ते राजकारण्यांचं आहे. असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube