पश्चिम तुर्की हादरलं! 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने इमारती कोसळल्या

Earth Quek तुर्कीमध्ये सोमवारी रात्री तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे तब्बल तीन ते चार इमारती कोसळल्या आहेत.

Letsupp (18)

Earth Quek in Türkiye 6.1 Richter scale Buildings collapses : गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक भागांमध्ये वारंवार तीव्र भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आतापर्यंत यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा तुर्की या देशामध्ये 27 ऑक्टोबरला सोमवारी रात्री तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के इतके तीव्र होते की, त्यामुळे तब्बल तीन ते चार इमारती कोसळल्या आहेत.

‘वस्त्रहरण’कार गंगाराम गव्हाणकर यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल एवढी होती. सोमवारी रात्री दहा वाजून 48 मिनिटांच्या आसपास पश्चिम तुर्कीमधील इस्तांबूल, बुरुसा मानसा आणि या भागांमध्ये हे धक्के जाणवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संकटकालीन उपाययोजना म्हणून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. यावर तुर्कीचे गृहमंत्री अली एरलीकाया यांनी सांगितलं की, या भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत तीन इमारती आणि एक दुकान कोसळलं आहे. यामध्ये अद्याप कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

राज्यावर मोंथा चक्रीवादळाचं सावट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार धुव्वाधार पाऊस

दरम्यान आगोदर तुर्की मध्ये 2023 साली अशाच प्रकारचा भूकंप झाला होता. ज्यामध्ये हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. याबाबत रेडक्रॉस संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सिरीयामध्ये आलेल्या भूकंपाने 55000 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. या भूकंपाची तीव्रता तब्बल 7.8 स्केल एवढी होती.

 

follow us