SS Rajamouli : 28 व्या मजल्यावर असताना अचानक…; राजामौली अन् मुलाने जपानमध्ये अनुभवला भूकंपाचा थरार

SS Rajamouli : 28 व्या मजल्यावर असताना अचानक…; राजामौली अन् मुलाने जपानमध्ये अनुभवला भूकंपाचा थरार

SS Rajamouli : चित्रपट निर्माते एसएस राजामौली ( SS Rajamouli ) आणि त्यांचा मुलगा एस एस कार्तिकीय गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आरआरआरच्या ( RRR ) स्क्रीनिंगसाठी गेलेले आहेत. या दरम्यान आज त्यांनी भूकंपाचे धक्के अनुभवल्याचं सांगितलं. त्यानंतर हे दोघेही पिता-पुत्र घाबरले होते. जपानमध्ये आज 5.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे धक्के जाणवले. यावेळी राजमौली पिता-पुत्र हे एका इमारतीच्या 28 व्या वाजल्यावर होते. हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जाहीरनामा कसा होतो तयार, निवडणूक आयोगाचे नियम काय? जाणून घ्या, ए टू झेड माहिती

आपल्या स्मार्ट वॉचवर भूकंपाच्या अलर्टची सूचना आल्याचा एक फोटो पोस्ट करत. राजा मुलींचा पुत्र एस एस कार्तिकीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भूकंपाची माहिती दिली. त्याने लिहिलं की, जपानमध्ये आम्ही अनुभवलेला हा भूकंपाचा धक्का भयानक होता. आम्ही आरआरआरच्या पूर्ण टीमसह 28 व्या मजल्यावर होतो. यावेळी जमीन हळूहळू हलत होती.

‘…तर आमचाही शिवसेना उमेदवारांना विरोध’; अजितदादांच्या आमदाराने बोलून दाखवलं

मात्र आम्हाला काही क्षणात कळालं की, हा भूकंप आहे मी भीतीने जोरात ओरडणार होतो. मात्र आसपास असणाऱ्या जपानी लोकांना याचा काही फरक पडत नव्हता. ते जास्त घाबरले नव्हते. त्या परिस्थितीला अगदी पाऊस पडणार आहे. असे सामान्य स्थितीप्रमाणे सामोरे जात होते. अशी माहिती या पोस्टमध्ये राजामौली यांच्या मुलाने दिली.

दरम्यान सध्या एस एस राजामौली यांचा चित्रपट आरआरआर हा जपान मध्ये रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट गेल्या 513 दिवसांपासून जपानमध्ये चालू आहे. जपानी लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेस दिसून येत आहे. त्यासाठीच राजामौली हे या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सध्या जपानमध्ये पोहोचले आहेत. यावेळी लोकांच्या गर्दीने त्यांना भेटले होते. तसेच एकाच चाहत्याने यावेळी त्यांना 1000 ओरिगॅमी क्रेन्स गिफ्ट दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज