Riya Ahir : पोलिसांना भिडणारी ‘व्हायरल गर्ल’ रिया अहिर राजकारणात प्रवेश करणार ?

Riya Ahir : नीट पेपर फुटी प्रकरणात आंदोलन करताना मुंबईत पोलिसांची व्हॅन अडवारी रिया अहीर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती आता सलमान खानच्या

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Riya Ahir

Riya Ahir : नीट पेपर फुटी प्रकरणात आंदोलन करताना मुंबईत पोलिसांची व्हॅन अडवारी रिया अहीर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती आता सलमान खानच्या ‘बिग बॉस’ (Bigg Boss) या शोमध्ये देखील दिसणार आहे. तर आता रिया अहीर राजकारणात येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याबाबत तिने एका मुलाखतीमध्ये बोलताना मोठा खुलास केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासूनआपल्या मित्रांकडे राजकारणात प्रवेश करण्याच्या आणि देशासाठी काहीतरी करण्याच्या आपल्या इच्छेबद्दल बोलत असल्याची माहिती तिने या मुलाखतीमध्ये दिली. यानंतर ती लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये तिला पोलिसांच्या व्हॅनसमोर उभे राहताना भीती वाटली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ती म्हणाली की, भीती तर प्रत्येकालाच वाटते. 20 जुलै रोजी दिल्लीत घडलेल्या क्रूर घटनांनंतर या विषयाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. चॅटजीपीटी (ChatGPT) आणि गुगलच्या (Google) माध्यमातून माहिती गोळा केली आणि त्यातून समजलं की, अनेक कायदेशीर कलमांचे उल्लंघन झाले होते आणि अनेक नियमांचे (प्रोटोकॉल्सचे) योग्य पालन केले गेले नव्हते.

यानंतर 20 जुलै रोजी तिने संयुक्त राष्ट्र (UN), मानवाधिकार आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना अनेक ईमेल पाठवले होते. तरीही, पुढे काय पाऊल उचलावे याबद्दल ती साशंक होती. 21 जुलै रोजी, जेव्हा विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन अडवली, तेव्हा ती तिथे उपस्थित होती. गाडीच्या आतून मुले “इन्कलाब जिंदाबाद” आणि “आझादी” अशा घोषणा देत होती. इतकेच नाही तर ती मुले हसतही होती. तिने नमूद केले की, मुलांच्या हातात तिरंगा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक होते.

इंग्लंड, आयर्लंडमध्ये पराभव अन् बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर; भारतीय संघात होणार बदल ?

तिने पोलिसांना विचारले होते की त्यांच्याकडे अधिकृत आदेश (मेमो) आहे का, त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा तिला जाणीव झाली की संविधान तिच्या बाजूने आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर घडणारी ही परिस्थिती ती तशीच चालू देणार नाही. तिला ती थांबवायची होती. रियाने हे देखील नमूद केले की, त्या वेळी तिथे कोणतीही महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हती. त्यानंतर तिने व्हॅनसमोर उभे राहून त्या मुलांना ताब्यात घेण्यापासून रोखले.

follow us