नवीन काऊंटी स्थापन करून चीनचे लद्दाखमध्ये घुसखोरीचे प्रयत्न; भारताचं चीनला कडवं प्रत्युत्तर!

नवीन काऊंटी स्थापन करून चीनचे लद्दाखमध्ये घुसखोरीचे प्रयत्न; भारताचं चीनला कडवं प्रत्युत्तर!

India’s bitter response to China after attempts to encroach on Ladakh: भारताने चीनला कडवा विरोध करत प्रत्युत्तर दिला आहे. नुकतेच भारतातील लडाखमध्ये चीनने अवैधरित्या नवीन काऊंटी स्थापन करण्याची योजना आखली आहे. त्यावरून भारताने म्हटले आहे की चीनचं हे पाऊल भारताला कमजोर करू शकत नाही.

फडणवीस कावेबाज माणूस, त्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही फक्त फोकसला आणली; जरांगेंचं टीकास्त्र

यावर संसदेत बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी लोकसभेमध्ये लिखित उत्तर दिलं. ज्यामध्ये ते म्हटले की भारताने चीनचा हा अवैध कब्जा मान्य केलेला नाही तसेच याचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.

नागपुरातील हिंसाचाराचा पहिला बळी; जखमी इरफान अन्सारीचा मृत्यू , तणावाचं वातावरण

दरम्यान चीनने नुकतंच होटन प्रांतामध्ये नवीन काउंटीची स्थापना करण्याची घोषणा केली याचा काही भाग भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो. त्यामुळे सरकारने यावर कोणती पावलं उचलली आहेत? त्यावर चीनचा काय प्रतिसाद मिळाला? असा प्रश्न संसदेत विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना परराष्ट्र राज्य मंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी उत्तर दिलं.

चॅटजीपीटीचा गजब दावा! वडिलांनाच म्हटलं स्वतःच्या मुलांचा खुनी, 21 वर्षांची शिक्षाही…OpenAI विरोधात खटला

त्याचबरोबर यावेळी बोलताना ते म्हणाले की भारत सरकार देखील सीमा भागातील संरक्षण ढाचे सुधारण्यावर विशेष लक्ष देत आहे. यासाठी अंदाजपत्रकात देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच गेल्या दशकाच्या तुलनेत यावेळी संरक्षणावर सर्वात जास्त खर्च केला जाणार आहे. असेही परराष्ट्र मंत्राने सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube