डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ‘नोबेल’ची वाट कठीणच, कसा मिळतो पुरस्कार; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ‘नोबेल’ची वाट कठीणच, कसा मिळतो पुरस्कार; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Donald Trump Nominates Nobel Prize : सध्या जागतिक राजकारणात पाकिस्तान पुन्हा अमेरिकेकडे झुकू लागला आहे. मागील काही दिवसांपासून तशाच घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये भोजनाचा कार्यक्रम झाला. यानंतरच पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Prize) ट्रम्प यांचं नाव पुढे केलं. खरंतर पाकिस्तानने हा जो काही उद्योग केला आहे याचं कनेक्शन भारताशी आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने (Pahalgam Terror Attack) ऑपरेशन सिंदूर लाँच केले होते. या मोहिमेत (Operation Sindoor) थेट पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही देशांत चार दिवस हल्ले सुरू होते. परंतु नंतर पाकिस्तानने विनंती केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केले होते. या घडामोडीनंतर क्रेडिट घेण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. दोन्ही देशांत युद्धविराम (India Pakistan Ceasefire) घडवून आणल्याची माहिती त्यांनी सर्वात आधी सोशल मीडियावर दिली होती. भारताने लागलीच ट्रम्प यांचं वक्तव्य नाकारलं होतं. पाकिस्तानने मात्र हेच सत्य मानून पुढील डावपेच टाकण्यास सुरुवात केली. डोनाल्ड ट्रम्प यांना थेट शांततेच्या नोबेल पुरस्कारसाठी नॉमिनेट केलं.

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळेल का..

आता प्रश्न असा आहे की पाकिस्तानने शिफारस केली म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळेल का? वास्तवात पाहिलं तर नोबेल पुरस्कार मिळवण्याची प्रक्रिया खूप जटिल आहे. पुरस्कार मिळवण्याची प्रक्रिया काय? पुरस्कार कसा मिळतो? कुणाला पुरस्कार हे कोण ठरवतं या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत. सर्वात आधी जाणून घेऊ या की नोबेल पुरस्कार म्हणजे नक्की काय आणि कुणाला दिला जातो?

नोबेल शांतता पुरस्काराची सुरुवात आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रातून झाली होती. हा पुरस्कार केमिस्ट्री, फिजिक्स, फिजियोलॉजी, शांती आणि साहित्य या क्षेत्रांत दिला जातो. सन 1901 मध्ये पहिल्यांदाच हा पुरस्कार दिला गेला होता. जगातील देशांत बंधुभाव वाढवणे, शस्त्रास्त्रांची संख्या कमी करणे आणि शांती संमेलने आयोजित करण्यात मोठे योगदान देणाऱ्या लोकांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो.

कोण कोण करू शकतो नॉमिनेशन?

नॉर्वेजियन नोबेल कमिटीमार्फत नोबेल शांतता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जाते. Nobel Peace prize साठी कुणीही व्यक्ती, संघटना किंवा आंदोलनाला नॉमिनेट केलं जाऊ शकतं. असे असले तरी नॉमिनेट करणाऱ्यांसाठी काही अटी आहेत. कुणीही पुरस्कारासाठी कोणत्याही नावाला नॉमिनेट करू शकत नाही. यासाठी एक मर्यादित लोकांची यादी आहे तेच लोक नावांची शिफारस करू शकतात.

मोठी बातमी! इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिका, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर बॉम्ब हल्ले

आता या पुरस्कारासाठी कोण कोण नॉमिनेशन करू शकते? एखादा सर्वसामान्य माणूस नॉमिनेट करू शकतो का याची माहिती घेऊ..

कोणत्याही देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, राष्ट्रीय सभा आणि सरकारांचे सदस्य, हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि पर्मनंट मध्यस्थता न्यायालयाचे सदस्य, एल इन्स्टिट्यूट डी ड्रोइटचे सदस्य, शांती आणि स्वातंत्रतेसाठी महिला आंतरराष्ट्रीय लीगचे आंतरराष्ट्रीय बोर्डाचे सदस्य, विद्यापीठांचे प्रोफेसर, एमेरीटी प्रोफेसर, युनिव्हर्सिटीचे रेक्टर, इतिहास, सामाजिक विज्ञान, कायदा, फिलॉसॉफी, धर्मशास्त्र आणि धर्माचे असोसिएट प्रोफेसर, परदेश धोरण संस्थानांचे डायरेक्टर,

अशा व्यक्ती ज्यांना आधीच नोबेल पुरस्कार मिळाला आहे, नोबेल पुरस्काराने सन्मानित संघटनांचे मुख्य डायरेक्टर, नॉर्वेजियन नोबेल समितीचे विद्यमान आणि माजी सदस्य यात नॉमिनेट होऊ शकतात. तसेच समितीचे माजी सल्लागार देखील नॉमिनेट होऊ शकतात.

डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सन 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाकिस्तानकडून नॉमिनेट (Pakistan News) करण्यात आलं आहे. पण कुणीही व्यक्ती कुणालाही नॉमिनेट करू शकत नाही ही गोष्ट आता आपल्या लक्षात आली आहे. पण वर दिलेल्या यादीतील लोक कोणत्याही व्यक्तीला या पुरस्कारासाठी नॉमिनेट करू शकतात.

2025 मध्ये किती लोकांचं नॉमिनेशन

या वर्षात आतापर्यंत 338 उमेदवारांचे नॉमिनेशन झाले आहे. यात 244 व्यक्ती आणि 94 संघटनांची नावं आहेत. याआधी सन 2024 मध्ये 286 लोक नॉमिनेट झाले होते. 2016 मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 376 उमेदवार या पुरस्कारासाठी शर्यतीत होते. परंतु कोण कोण नॉमिनेट झाले आहे याची माहिती समितीकडून कधीच दिली जात नाही. पण ज्याला नॉमिनेट केलं आहे तो याचा खुलासा नक्कीच करू शकतो.

नॉमिनेशन कसे होते?

नॉर्वेजियन नोबेल कमिटी एक ऑनलाइन नॉमिनेशन फॉर्म लाँच करते. या माध्यमातून नॉमिनेशन केले जाते. पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्याची प्रक्रिया जितकी कठीण आहे तितकीच पुढील प्रक्रिया आणखी कठीण आहे. नॉमिनेट होणे फक्त एक टप्पा आहे साध्य याहीपेक्षा खूप दूर आहे. नोबेल पुरस्कार विजेते निवडण्याचे काम कमिटीचे आहे. या समितीत नॉर्वेजियन संसदेकडून नियुक्त पाच सदस्य सहभागी असतात. नॉमिनेट केलेल्या उमेदवारांतून योग्य व्यक्तींची निवड या सदस्यांकडून केली जाते. हा पुरस्कार ओस्लोमध्ये दिला जातो तर बाकीच्या श्रेणीतील पुरस्कार स्टॉकहोम (स्वीडन) येथे दिले जातात.

अमेरिकेचा इराणवर हल्ला, ट्रम्प यांना शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा देणाऱ्या पाककडून हल्ल्याचा निषेध

स्टेप 1 : नॉर्वेजियन नोबेल समिती सप्टेंबर महिन्यात नामांकन मिळवण्यासाठी तयारी करते.

स्टेप 2 : फेब्रुवारीपर्यंत नॉमिनेशन कमिटीकडून स्वीकारले जातात. यानंतर आलेल्या नामांकनांचा विचार केला जात नाही.

स्टेप 3 : फेब्रुवारी-मार्च दरम्यान नॉमिनेशन लिस्टच्या छाननीचे काम केले जाते. लोकांना शॉर्ट लिस्ट केले जाते. नॉमिनेट केलेल्या व्यक्तीने शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेमकं काय केलं याचा अनेक अंगांनी विचार करते. नंतर आणखी एक यादी तयार केली जाते.

स्टेप 4 : मार्च ऑगस्ट दरम्यान सल्लागारांकडून शॉर्ट लिस्ट केलेल्या यादीचा आढावा घेतला जातो. नावांवर शिक्कामोर्तब करण्यााआधी पुन्हा एकदा विचार केला जातो.

स्टेप 5 : ऑक्टोबर महिन्यात नोबेल पुरस्कारासाठी विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते. याच महिन्यात निश्चित केले जाते की 10 डिसेंबर रोजी कुणाला नोबेल शांतता पुरस्कार द्यायचा.

स्टेप 6 : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला समिती लोकांच्या नावाची निवड करते. बहुमताच्या आधारे नाव निश्चित केले जाते.

स्टेप 7 : 10 डिसेंबर या दिवशी विजेत्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार प्रदान केला जातो. याचबरोबर इतिहासात त्या व्यक्तीचं नाव कायमचं कोरलं जातं. नोबेल शांतता पुरस्कार समारोह 10 डिसेंबर रोजी नॉर्वेतील ओस्लो शहरात आयोजित केला जातो. नोबेल पुरस्कार पदक, डिप्लोमा आणि पुरस्कार रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube