Operation Sindoor : पाकने गोळी चालवली पण, आम्ही धमाकाच केला; जनरल उपेंद्र द्विवेदी

Operation Sindoor : पाकिस्तानने गोळी चालवली पण आम्ही धमाकाच केला, असं भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dvivedi) यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी राजस्थानातील लोंगेवाला भागातील भारतीय जवानांची भेट घेत चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आम्ही शत्रूची दहशतवादी स्थळांना उध्वस्त केलं. दहशतवाद्यांचं मनोबल कमी करण्यात भारतीय सेना यशस्वी ठरली आहे. शत्रूंकडून भारतातील सीमेवरील गावांना निशाणा साधण्यात आला. त्यानंतर आता पाकच्या गोळीबाराला आपला गोळा प्रत्युत्तर देणार असल्याचं जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय.
6, 7 मे रोजी भारतीय जवानांनी रात्रीच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत शत्रूला सडेतोड उत्तर दिलं. 25 मिनिट चाललेल्या या मोहिमेत 24 मिसाइल्सच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे स्थळे उध्वस्त केली आहेत. या ठिकाणांपैकी पाच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भाग काश्मीरात होता. या भागात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. याच भागात भारतीय सेनाने दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मुंबई हादरली! कुटुंबीयांच्या तिहेरी हत्याकांडाने उडाली खळबळ; वाचा, कशामुळं अन् काय घडलं?
राजस्थानातील जैसलमेरपासून ते कच्छपर्यंत चाललेल्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय जवानांनी आपले शौर्य दाखवले आहे. देशाला भारतीय जवानांच्या शौर्याचा अभिमान आणि गर्व असल्याचंही जनरल द्विवेदी म्हणाले आहेत. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष्य केलं होतं. पुरूषांना टार्गेट करून मारण्यात आलं, यामध्ये अनेक महिला विधवा झाल्या. त्यांच्या पतींना त्यांच्यासमोरचं गोळ्या घालून त्यांना निवडकपणे मारण्यात आले. एका नवविवाहित महिलेच्या पतीला तिच्या समोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. दहशतवाद्यांनी त्या महिलेला सांगितले की, जाऊन मोदींना हे सांग. या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, दहशतवाद्यांच्या आकाला योग्य उत्तर देण्यात येईल. आज भारताने पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी स्वतः या ऑपरेशनला ‘सिंदूर’ असे नाव दिले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. सिंदूर हिंदू धर्माशी देखील संबंधित आहे. दहशतवाद्यांनी महिलांचे सिंदूर नष्ट केले होते, म्हणून या ऑपरेशनला सिंदूर असे नाव देण्यात आले होते.