खळबळजनक! पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत केक अन् सेलीब्रेशन…, ज्योती मल्होत्राचा ‘त्याच’ अधिकाऱ्यासोबत फोटो

खळबळजनक! पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत केक अन् सेलीब्रेशन…, ज्योती मल्होत्राचा ‘त्याच’ अधिकाऱ्यासोबत फोटो

Jyoti Malhotra Seen With Same Man Spotted delivering Cake : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एक माणूस केक पोहोचवताना दिसला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्योती मल्होत्रा ​​देखील याच व्यक्तीसोबत दिसली होती. ब्लॅकआउट दरम्यान देखील युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​पाकिस्तानी (Pakistan) हँडलर्सच्या संपर्कात होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने (Jyoti Malhotra) पाकिस्तान आणि चीनलाही भेट दिली होती.

हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून चर्चेत आहे. याबाबत, रविवारी हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने असा दावा केलाय की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ज्योती मल्होत्राला त्यांची प्रॉपर्टी (Pakistan High Commission Delhi) म्हणून वापरत होती. ज्योतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान ज्योती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागली, धुराचे मोठे-मोठे लोट

हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी म्हटलंय की, मल्होकडे लष्करी किंवा संरक्षण कारवायांशी संबंधित कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही, जी ती शेअर करू शकेल. पण ती थेट पीआयओच्या संपर्कात होती. हरियाणातील हिसार येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितले. ती इतर YouTubers आणि एन्फ्लुएर्सच्या संपर्कात होती. पीआयओच्याही संपर्कात होती. हे देखील एक प्रकारचे युद्ध आहे, ज्यामध्ये पाकिस्तान प्रभावशाली लोकांना भरती करून त्यांची कहाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

नगर शहरातील मेडिकल कॉलेज शिर्डीला नेण्याचा डाव…लंकेंचा अप्रत्यक्ष विखेंना टोला

पाकिस्तानसोबत संपर्कात असणाऱ्या 33 वर्षीय ज्योतीला शुक्रवारी न्यू अग्रसेन एक्सटेंशन येथून ज्योतीला अटक करण्यात आली. तिच्यावर अधिकृत गुपिते कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube