विष्णू चाटेने अर्ज मागे घेतला तर वकिलांची पेन ड्राईव्हची मागणी, संतोष देशमुख प्रकरणात आज न्यायालयात काय घडलं?

विष्णू चाटेने अर्ज मागे घेतला तर वकिलांची पेन ड्राईव्हची मागणी, संतोष देशमुख प्रकरणात आज न्यायालयात काय घडलं?

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे संरपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पाचवी सुनावणी पार पडली. या सुनावणीत या प्रकरणात आरोपी असणाऱ्या विष्णू चाटेने (Vishnu Chate) आपला दोषमुक्ती अर्ज मागे घेतला आहे. वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) वकिलांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची मागणी सरकारी पक्षाकडे केली आहे.

तर दुसरीकडे विशेष सरकारी वकील उज्जवल निकम (Ujjwal Nikam) अनुपस्थित होते. तर सुनावणी दरम्यान न्यायालयात आरोपी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे (Vikas Khade) आणि आरोपी विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे (Rahul Munde) उपस्थित होते. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे.

सुनावणी पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे म्हणाले की, विष्णू चाटे याने दाखल केलेले डिस्चार्ज अप्लिकेशन मागे घेतले आहे. मूळ फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख तसेच केदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी न्यायालयासमोर म्हणणं मांडलं आहे. तसेच आरोपी विष्णू चाटे याने लातूरवरुन बीड जिल्हा कारागृहात येण्यासाठी केलेल्या अर्जावर न्यायालय निर्णय देणार अशी माहिती सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.

तर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणाले की, आजची नेमलेली तारीख वाल्मिक कराड यांच्या डिस्चार्ज अर्जासाठी होती. आज तीन मुळ फिर्यादी यांनी त्यांचे म्हणणे सदर केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे. हत्या प्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपींना मिळणे गरजेचे आहे, आरोपींसाठी महत्तवाचं आहे. म्हणून आम्ही पेनड्राईव्हची मागणी केली आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराडच्या वकील विकास खाडे यांनी दिली.

‘भारत धर्मशाळा नाही…’, तमिळ निर्वासितांबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

तसेच आम्ही पेनड्राईव्हची मागणी केली. काही पुरावे दिले आहे तर काही पुरावे मिळणे बाकी आहे. असं देखील वकील विकास खाडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube