मस्साजोगचा खटला उज्जवल निकम लढणार? CM फडणवीसांनी सांगितली ‘ही’ अडचण…

  • Written By: Published:
मस्साजोगचा खटला उज्जवल निकम लढणार? CM फडणवीसांनी सांगितली ‘ही’ अडचण…

Devendra Fadnavis : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराडविरुद्ध उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्याकडे वकीलपत्र द्यावं, अशी मागणी होतेय. दरम्यान, निकम यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी निकमांच्या या हत्येप्रकरणातील ‘एन्ट्री’वर भाष्य केलं.

स्टार प्लसवरील शो “घुम है किसीके प्यार में” मध्ये येणार नवीन ट्विस्ट, भाविका शर्माने केला मोठा खुलासा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच गुरुवारी (१६) रात्री सागर बंगल्यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी झालेल्या चर्चेवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकीलाची नियुक्ती करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. उज्ज्वल निकम यांना या संदर्भात विनंती करण्यात आली आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. पण, मला नियुक्त केल्यानंतर काही लोक राजकारण करतात, राजकीय रंग देतात. हे मला योग्य वाटत नाही, असं निकम यांनी मला सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.

shreya choudhary: ‘१९ व्या वर्षी स्लिप डिस्क, वाढलेलं ३० किलो वजन कमी केलं’; श्रेयाने सांगितला फिटनेस प्रवास! 

देशात अनेक वकील आहेत. जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षांकडून त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्याचं राजकारण होत नाही. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणे हे कुठंतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखेच आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ते म्हणाले, उज्ज्वल निकम यांचा आतापर्यंतचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा ते केस हाती घेतात तेव्हा गुन्हेगारांना शिक्षा ही होतेच. पण आता जर त्यात कुणाला गुन्हेगारांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकम यांना विरोध करतील, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं.

CIDचे तपास अधिकारी बदलले
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आता त्यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube