shreya choudhary: ‘१९ व्या वर्षी स्लिप डिस्क, वाढलेलं ३० किलो वजन कमी केलं’; श्रेयाने सांगितला फिटनेस प्रवास!

  • Written By: Published:
shreya choudhary: ‘१९ व्या वर्षी स्लिप डिस्क, वाढलेलं ३० किलो वजन कमी केलं’; श्रेयाने सांगितला फिटनेस प्रवास!

shreya choudhary : आज सगळे श्रेया चौधरीवर (Shreya Chaudhry) फिदा आहेत! बंदिश बँडिट्स (Bandish Bandits) या सर्वांनी कौतुक केलेल्या वेब सीरिजमधील तिच्या अप्रतिम अभिनयापासून ते तिच्या आकर्षक रूपड्यापर्यंत, श्रेया रोजच चर्चेत आहे. पण श्रेयाचा फिटनेसचा प्रवास फारसा सोपा नव्हता. १९ व्या वर्षी स्लिप डिस्क झालं, वजन ३० किलोपर्यंत वाढलं, पण नंतर त्यावर मात करून तिने तिचे स्वप्न गाठले.

‘…म्हणून मंत्रिपदाची काही अपेक्षा नव्हती, आम्ही फडणवीसांच्या मागे उभे; सदाभाऊ खोत यांचे मोठे विधान 

आठवडाभरापूर्वी, श्रेयाने तिच्या लहानपणीच्या आदर्श ऋतिक रोशनला तिच्या फिटनेससाठी प्रेरणा दिल्याबद्दल श्रेय दिलं होतं. आता, एका हृदयस्पर्शी पोस्टमध्ये, तिने तिच्या फिटनेसची गाडी रुळावरून का उतरली होती याचे खरे कारण सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Chaudhry (@shreya__chaudhry)

तिने एक पोस्ट इंस्टाग्रामवर लिहिली. त्या पोस्टमध्ये तिने म्हटलं की, “मी जेव्हा सोशल मीडियावर माझ्या फिटनेसच्या संघर्षाबद्दल सांगितलं, तेव्हा लोकांकडून इतका स्नेह आणि पाठिंबा मिळेल असं वाटलं नव्हतं. मला सशक्त वाटलं, म्हणून मी माझं मन मोकळं केलं. लोकांची सकारात्मक प्रतिक्रिया मला अजूनही काहीतरी शेअर करायला प्रेरणा देते. मी हे सगळं उघड केलंय, कारण लोकांनी स्वतःवर आणि त्यांच्या मानसिक सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर ते कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात.”

‘कितना समय लगेगा’?; जखमी अवस्थेत सैफने रिक्षा चालकाला विचारला होता प्रश्न; वाचा ‘त्या’ रात्रीचा थरार 

श्रेया पुढे म्हणाली, १९ व्या वर्षी माझ्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. मी मानसिकदृष्ट्या खूपच खचले होते. या सगळ्यात माझं वजन खूप वाढलं. यामुळे माझ्या आरोग्यावरही परिणाम झाला. सगल्याचं शारीरिक हालचाल बंद झाल्या आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यात स्लिप डिस्क झाल्याने सगळं आणखी कठीण झालं. पण मी माझ्या स्वप्नांसाठी खूप महत्त्वाकांक्षी होते, त्यामुळे हा एक मोठा धक्का होता. मी स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचं मला जाणवलं.

“एका रात्री मी स्वतःला सांगितलं की, आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी मला स्वतःला निरोगी ठेवायचं होतं. त्यानंतर मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं, ३० किलो वजन कमी केलं, आणि स्लिप डिस्कची समस्या कधीच परत आली नाही.”

श्रेया पुढे म्हणाली, “आज मी माझ्या फिटनेसच्या उत्तम अवस्थेत आहे. फिट राहूनच मी अभिनेत्री होऊ शकले. मला वाटतं की जीवनातल्या अडथळ्यांकडे नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी, त्यांना सकारात्मकतेने बघायला हवं. शेवटी, जीवन ही एक भेट आहे आणि आपण ती संपूर्णपणे जगायला हवी.”, असं श्रेया म्हणाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube