‘…म्हणून मंत्रिपदाची काही अपेक्षा नव्हती, आम्ही फडणवीसांच्या मागे उभे; सदाभाऊ खोत यांचे मोठे विधान

  • Written By: Published:
‘…म्हणून मंत्रिपदाची काही अपेक्षा नव्हती, आम्ही फडणवीसांच्या मागे उभे; सदाभाऊ खोत यांचे मोठे विधान

Sadabhau Khot : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं. या मंत्रिमंडळात अनेकांना डावलण्यात आलं. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, रयत क्रांती सेनेचे नेते सदाभाऊ खोत यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. दरम्यान, आता सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदाची काही अपेक्षा नव्हती, असं विधान केलं.

‘कितना समय लगेगा’?; जखमी अवस्थेत सैफने रिक्षा चालकाला विचारला होता प्रश्न; वाचा ‘त्या’ रात्रीचा थरार 

सदाभाऊ खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. मंत्रीपद मिळाल्यानंतर नेते दिल्लीला येतात. मात्र, तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही तरी तुम्ही दिल्लीला आलात, असं सदाभाऊ खोत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता खोत म्हणाले की, आम्ही दोघेही (गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत) चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते आहोत. आम्हाला पदे मिळतील किंवा नाही या भावनेतून आम्ही कधीही काम केलं नाही, करत नाही आणि करणारही नाही. आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत-लढत इथपर्यंत आलो आहोत. आमचा लढा विस्थापितांचा लढा आहे. त्यामुळं आम्हाला मंत्रिपदाबाबत अशा काही अपेक्षा नव्हत्या, असं खोत म्हणाले.

क्रिकेटर Rinku Singh आणि यूपीची खासदार अडकणार लग्न बंधनात ? पण मुलीच्या वडिलांकडून वेगळीच माहिती 

‘…म्हणूनच आम्ही फडणवीसांच्या मागे उभे राहिलो’
खोत पुढं म्हणाले, आम्ही देवभाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांच्या पाठीमागे उभे आहोत. कारण देवेंद्र फडणवीस हे विस्थापितांची लढाई प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस सत्तेत येईपर्यंत, आमचं कामं होतं एवढचं होतं की, जसं एखाद्या लढाईत राजा सिंहासनापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत सैनिक हातातील तलवार टाकत नाही, तसं आम्ही मैदानात लढत राहिलो.

खोत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आले. याचं कारण म्हणजे, त्यांना गावगाडा उभा करायचा आहे. महाराष्ट्र विकसित करायचा आहे. हीच भावना ठेऊन फडणवीस राजकारणात काम करत आहे, असं खोत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube