Download App

Video : मुळात प्रत्येक जण बायसेक्शुअल…; अभिनेत्री स्वरा भास्कर नेमकं काय म्हणाली?

आपण सगळेच खरेतर समलैंगिक (बायसेक्शुअल) आहोत. जर माणसाला त्याच्या इच्छेनुसार जगू दिलं, तर प्रत्येक जण समलैंगिक असेल.

  • Written By: Last Updated:

Swara Bhaskar : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्क (Swara Bhaskar) तिच्या बेधडक वक्यव्यामुळे नेहमीच चर्तेच असते. नुकताच तिच्या एका मुलाखतीतील वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. तिनं प्रत्येक माणूस मुळात बायसेक्शुअल (Bisexual) असतो, असं विधान केलं. यासोबतच तिने समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव (Dimple Yadav) यांना आपले क्रश असल्याचं म्हटलं. या विधानानंतर तिला सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. आता या वादावर अभिनेत्रीने पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलीय.

‘नींद भी तेरी’: अमेझॉन MGM स्टुडिओ इंडिया अन् अनुराग कश्यप यांच्या ‘निशानची’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित 

स्वरा भास्करने पुन्हा एकदा एक्सवरील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिचा बायो अपडेट केला आहे आणि या संपूर्ण वादाला मजेदार पद्धतीने उत्तर दिलंय. तिचा बायो अपडेट करताना तिने लिहिले आहे- ‘गर्ल क्रश एडवोकेट. पार्टटाइम अ‍ॅक्टर, फुलटाइम ट्विटर पेस्ट. कैओस क्वीन. जगाच्या शेवटी खरेदी. फ्री फिलिस्तीन.’ तिने तिच्या बायोमध्ये ‘गर्ल क्रश अ‍ॅडव्होकेट’ हा शब्द जोडलाय, ज्याला लोक थेट डिंपल यादवशी जोडत आहेत.

जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन, सरकारचे नवे नियम जाहीर 

डिंपल यादवला म्हटले क्रश…
स्वराने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं, आपण सगळेच खरेतर समलैंगिक (बायसेक्शुअल) आहोत. जर माणसाला त्याच्या इच्छेनुसार जगू दिलं, तर प्रत्येक जण समलैंगिक असेल. या पुढं तिनं सांगितलं की, समाजाने हजारो वर्षांपासून पुरुष-स्त्री नात्याला (हेटरोसेक्शुअलिटी) आदर्श मानलं आहे, जे मानवजातीचा वंश पुढे नेण्यासाठी आदर्श ठरवण्यात आलं. स्वराच्या या वक्तव्याने नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, स्वराच्या या विधानाने समलैंगिकता आणि लैंगिक ओळखीच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे. काहींनी तिचं मत मुक्त विचारांचं लक्षण मानलं, तर काहींनी याला बिनबुडाचा दावा ठरवलं.

स्वराने यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यावर आपला क्रश असल्याचंही जाहीरपणे सांगितलं. मुलाखतीच्या मध्यभागी, होस्टने विचारले की तिला कोणावर प्रेम आहे. यावर स्वराने समाजवादी पक्षाच्या लोकसभा खासदार डिंपल यादवचे नाव घेतले. तिने असेही सांगितले की ती अलीकडेच डिंपलला भेटली होती. स्वराच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

follow us