चेंगराचेंगरीपेक्षा चित्रपटातील सीन पाहून जो समाज भावूक होतो, तो मनाने आणि आत्म्याने मेलेला समाज; छावा सिनेमाबाबत स्वराचे विधान

Swara Bhaskar : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ (Chhaava Movie) या चित्रपटाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांचे शौर्य आणि मुघलांकडून झालेला त्यांचा छळ दाखवण्यात आला. हा छळ पाहून थिएटरमधून बाहेर पडणारे प्रेक्षक भावूक होत आहे. अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलयं. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने सिनेमाबाबत ट्वीटकरून भाष्य केले आहे. स्वराने देशातील वाढत्या चेंगराचेंगरीच्या घटनांऐवजी चित्रपटाला महत्त्व दिल्याने समाजावर टीका केली आहे.
जर समाज चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यंपेक्षा चित्रपटातील ५०० वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय, अशी टीका स्वराने केली.
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses – is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
स्वरा भास्करने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात तिने लिहिलंय की, चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झालेत. पण, ते सोडून जो समाज काल्पनिक चित्रपटातील ५०० वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल किंवा संताप व्यक्त करत असेल तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय… चुकीच्या व्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह बुलडोद्वारे काढावे लागले. यावर चिंता न करता समाज ५०० वर्षांपूर्वीचेा सीन पाहून होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असं स्वरा भास्करने म्हटलं.
दरम्यान, स्वराचे हे ट्विट समोर येताच सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. एका युजरने तिच्या पोस्टला उत्तर देताना लिहिलं की, या चित्रपटात ताजमहाल आणि मुघल-ए-आझम सारख्या काल्पनिक प्रेमकथांपेक्षा धर्मांध मुघलांचा खरा इतिहास दाखवण्यात आला आहे. त्यामुळं धर्मांतरित महिला नाराज आहे. तुम्ही औरंगजेबाने संभाजीराजेंना छळले नाही, हे सिध्द करा. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला काल्पनिक आणि औरंगजेबाच्या अत्याचारांना खोटे ठरवून तिने मराठ्यांचा सन्मान नाकारला, असं लिहिलं.
दरम्यान, ‘छावा’ हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे तर दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकून घेतोय. हा सिनेमा पाहून अनेकांना अश्रू आवरता येत नाहीत. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित आहे.