‘छावा फिल्म वाईट…!’ स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्ताद काळेचं धक्कादायक विधान, फेसबुक पोस्ट चर्चेत

‘छावा फिल्म वाईट…!’ स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्ताद काळेचं धक्कादायक विधान, फेसबुक पोस्ट चर्चेत

Aastad Kale Allegation On Chhaava Movie : छावा चित्रपट (Chhaava Movie) प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत. परंतु बॉक्स ऑफिस अन् चाहत्यांच्या मनावर विकी कौशलच्या (Vicky Kaushal) छावाची क्रेझ अजूनही कायम आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. रिलीज होण्याअगोदर पासूनच छावा चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात होता. चित्रपटातील अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जातोय. आता अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) चित्रपटावर आक्षेप घेत काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत ट्विस्ट, भाजप अन् काँग्रेस एकत्र; कसा घडला चमत्कार?

छावा सिनेमात अभिनेता आस्ताद काळे याने सूर्या नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती. परंतु त्याने देखील चित्रपटासंबंधी आक्षेप घेत फेसबुक पोस्टद्वारे काही गोष्टी मांडल्या आहेत.
सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी अस्तादने त्याला खटकलेले मुद्दे प्रेक्षकांशी शेअर (Chhaava) केले आहेत.

WhatsApp Image 2025 04 15 At 11.16.07 AM

WhatsApp Image 2025 04 15 At 11.16.07 AM

फेसबुक पोस्टमध्ये आस्तादने म्हटलंय की, मी आता खरं बोलणार आहे. छावा फिल्म वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटिक आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. सर्वतोपरी वाईट आहे. औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो या वेगानी चालू शकेल? असा देखील सवाल अस्तादने केलाय.

Stock Market : भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी! निफ्टीने घेतली 500 अंकांची उसळी, ‘या’ 10 शेअर्समध्ये प्रचंड वाढ

आणखी एका पोस्टमध्ये आस्तादने लिहिलंय की, मी आता खरं बोलणार आहे… हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं, याचे काय पुरावे आहेत? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायेत? आणि ते खातायत? हे कसं चालतं? असं देखील आस्तादने पोस्टमध्ये लिहिलंय.

WhatsApp Image 2025 04 15 At 11.15.57 AM

WhatsApp Image 2025 04 15 At 11.15.57 AM

आस्ताद काळेच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आहे. दोन महिने कुठे होतास, असं नेटकऱ्यांनी विचारलं आहे. अनेकजण आस्तादच्या या विचारांचं समर्थन देखील करताना दिसत आहेत. छावा सिनेमाने 57 दिवसांमध्ये हिंदीत एकूण 584 कोटी कमावले आहेत. तर जगभरात छावाने 800 कोटी कमवले आहेत. अस्ताद काळेने ही फेसबुक पोस्ट डिलीट केल्याचं समोर आलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube