How IMF Gets Money For Giveing Loan To Pakistan Aswell As Other Country : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF). या संस्थेचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या (India Pakistan War) परिस्थिती IMF नं पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, IMF कडे इतके पैसे येतात कुठून आणि ही संस्था नेमकी कशी काम करते? याचबद्दल जाणून घेऊया…
Video : सियालकोटसह पाकचे 7 एअरबेस उद्ध्वस्त; भारताचं S 400 अन् ब्रह्मोस सेफ : सोफिया कुरेशी
IMF चा मुख्य अजेंडा काय?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) त्यांच्या सर्व 191 सदस्य देशांना शाश्वत विकास आणि समृद्धी साध्य करण्यास मदत करण्यास वचनबद्ध आहे आणि हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे. उत्पादक क्षमता, रोजगार निर्मिती आणि आर्थिक कल्याणासाठी आवश्यक असलेली आर्थिक स्थिरता आणि आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक धोरणांमध्ये IMF सदस्य देशांना पाठिंबा देते. यात त्याची प्रामुख्याने तीन उद्दिष्टे आहेत.
– आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणे.
– व्यापार आणि आर्थिक वाढीला प्रोत्साहन देणे.
– समृद्धीला हानी पोहोचवणाऱ्या धोरणांना परावृत्त करणे.
IMF कुठून आणते एवढे पैसे?
ही संस्था त्यांच्या सदस्य देशांकडून त्यांच्या क्षमतेनुसार एक निश्चित शुल्क आकारते, ज्याला कोटा असे म्हणतात. यात क्षमता म्हणजे देशाची आर्थिक स्थिती, जीडीपी, परकीय व्यापार इत्यादी होय. याच आधारावर कोटा ठरवला जातो. संस्थेचे सदस्यत्व घेताना त्या-त्या देशांना हा कोटा भरावा लागतो. आयएमएफसाठी हाच निधीचा मुख्य स्रोत आहे. याशिवाय, IMF कर्जावरील व्याजातूनही कमाई करते. गरज पडल्यास, आयएमएफने निधी गोळा करण्यासाठी इतर काही उपाययोजनादेखील आखल्या आहेत.
India-Pak War : विश्वयुद्ध ते भारत-पाक तणाव…; करोडोंंचा जीव वाचवणाऱ्या सायरनचा इतिहास काय?
IFM विकसित देशांकडून घेतं कर्ज
आयएमएफ स्वतः कर्जदेखील घेऊ शकते. यात अमेरिका, जपान आणि जर्मनीसह किमान तीन डझन विकसित देशांचा समावेश आहे. याच देशांकडून गरज भासल्यास IMF कर्ज घेते. याला न्यू अरेंजमेंट्स टू बोर (NAB) असे म्हणतात. याशिवाय, जेव्हा गरज पडेल तेव्हा ते सदस्य देशांकडून कर्ज देखील घेते, ज्याला द्विपक्षीय कर्ज करार (BBA) असे म्हणतात. या प्रकरणात IMF कर्ज देणाऱ्या देशाशी द्विपक्षीय करार करते.
IMF कसे काम करते?
IMF च्या वेबसाइटनुसार, सध्या सदस्य देशांची संख्या 191 असून या सर्व सदस्य देशांकडून IMF कोट्याची रक्कम गोळा करते. याच आधारावर एखाद्या देशाला किती कर्ज मिळू शकते हे ठरवले जाते. आयएमएफ सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर नियमित लक्ष ठेवते. तसेच दरवर्षी सदस्य देशांच्या आर्थिक स्थितीचा अहवालदेखील प्रसिद्ध करते. तसेच सदस्य देश कोणत्याही नवीन संकटात सापडू नये यासाठी आयएमएफ आर्थिक धोरणे मजबूत करण्यासाठी वेळोवेळी सूचनादेखील देण्याचे काम करते.
India-Pak War : पाकिस्तानची आता खैर नाही; मोदी सरकारचा लष्करप्रमुखांना विशेष अधिकार
कर्ज देण्याच्या अटी आणि शर्ती काय?
एखाद्या देशाला कर्ज देताना आयएमएफ कधीकधी कठोर अटी देखील लादते. जसे की, कर प्रणालीत सुधारणा करणे, अनुदान कमी करणे आणि सरकारी खर्च कमी करणे यासारख्या कठोर तरतुदींचा समावेश आहे. अटी पूर्ण न झाल्यास सदस्य देशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची तरतूदही यात आहे. आयएमएफ संकटग्रस्त देशांना प्रामुख्याने जलद वित्तपुरवठा व्यवस्था, विस्तारित निधी सुविधा आणि स्टँडबाय व्यवस्था या तीन स्वरूपात कर्ज देते.
प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य
IMF ही संस्था सदस्य देशांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केवळ अहवाल आणि सूचना देत नाही तर, त्या अहवालांची अंमलबजावणी करण्याचे मार्गदेखील सांगते. यात सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांना प्रामुख्याने बँकिंग व्यवस्थेत सुधारणा, कर आकारणीत सुधारणा, नियमितपणे डेटा गोळा करणे आणि त्या आधारावर सुधारणा करणे यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून प्रशिक्षण देते.
शिवाय, तांत्रिक सहाय्यदेखील प्रदान करते. याचा मुख्य फायदा संकटात सापडलेला देश शक्य तितक्या लवकर आर्थिक संकटातून सहजपणे बाहेर पडू शकेल हा आहे. या सर्व गोष्टी व्यवस्थापित करण्यासाठी आणि सदस्य देशांना मदत मिळत राहावी यासाठी आयएमएफ जागतिक बँक, संयुक्त राष्ट्रे सारख्या संस्थांची मदत घेते.
NSA अजित डोभाल यांचं फेसबूक अकाउंट नाहीच; सोशल मीडियावरील अकाउंट फेक, PIB चा खुलासा
IMF चे मोठे कर्जदार देश कोणते?
खरं तर, आयएमएफ त्यांच्या सदस्य देशांना त्यांच्या स्वतःच्या अटी आणि शर्तींनुसार आवश्यकतेनुसार कर्ज देते. या यादीतील काही प्रमुख आणि मोठे कर्जदार देश म्हणजे अर्जेंटिना, युक्रेन, इजिप्त, पाकिस्तान, इक्वेडोर, कोलंबिया, अंगोला, केनिया, बांग्लादेश आहेत. IMF च्या ताज्या अहवालानुसार, सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या देशांमध्ये अर्जेंटिनाने सर्वाधिक 40.9 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. तर, बांग्लादेशने सर्वात कमी म्हणजे अवघे 2.69 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे.
युद्धग्रस्त युक्रेनने 14.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले असून, कर्जदारांच्या यादीमध्ये भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने 8.3 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले असून, भारतासोबतच्या सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानने कर्जासाठी IMF कडे हात पसरले होते. त्यानंतर IMF ने पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.