Download App

पाकिस्तानला धक्का! IMF ने केली बत्ती गुल, सरकार नागरिक सगळेच हैराण; काय घडलं?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनं पाकिस्तानला अशा एका नियमाच्या कचाट्यात अडकवल आहे ज्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

Pakistan News : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनं (IMF) पाकिस्तानला अशा एका नियमाच्या कचाट्यात अडकवल (Pakistan News) आहे ज्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. या नियमाचे पालन पाकिस्तानला करावेच लागणार आहे. पण जर या नियमाचे पालन केले तर येथील जनता, उद्योग आणि सरकार सगळ्यांनाच अडचणीचे होणार आहे. आयएमएफने यंदा कोणतीही सवलत न देता औद्योगिक कॅप्टीव्ह पॉवर प्लांटच्या गॅस पुरवठ्यावर भरमसाट शुल्क लागू करा असे संघेटनेने पाकिस्तान सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

पाकिस्तान आणि आयएमएफ यांच्यात सप्टेंबर महिन्यात एक करार झाला होता. यानुसार पाकिस्तान सरकारला एक महत्त्वाचा निकष पूर्ण करायचा आहे. जानेवारी 2025 पर्यंत CPPS ला गॅस पुरवठा बंद करणे यामध्ये समाविष्ट आहे. या अटीचे पालन केले तर मार्च महिन्यात पाकिस्तानला आयएमएफकडून 1 बिलियन कर्जातील दुसरा हप्ता मिळणार आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान सरकार आणि आयएमएफमध्ये एक आढावा बैठक देखील होणार आहे.

आयएमएफच्या करारामध्ये म्हटले आहे की जानेवारी 2025 पर्यंत कॅप्टीव्ह पॉवरचा उपयोग पूर्णपणे बंद करण्यात येईल. या करारावर पाकिस्तानचे अर्थमंत्री आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर यांनी मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात सह्या केल्या होत्या. आता या कराराचे पालन करणे पाकिस्तानला बंधनकारक आहे.

पाकिस्तानला तिहेरी झटका! सामना गमावला, आयसीसीने केली मोठी कारवाई

पाकिस्तानचा पेट्रोलियम विभाग तसेच लाहोर येथील सुई नोरदर्न गॅस पाइपलाइन लिमिटेड आणि कापड निर्यातदारांच्या नेतृत्वातील औद्योगिक क्षेत्राच्या दबावात या कराराला उलटवण्याच्या प्रयत्नात आहे. पेट्रोलियम विभाग आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की दरवर्षी जवळपास 50 कार्गो तसेच पाच वर्षांत 250 कार्गोंचा अधीशेष आहे. औद्योगिक संस्थांचे म्हणणे आहे की गॅस एलएनजी डीस्कनकेशनच्या स्थितीत त्यांच्या निर्यात स्पर्धेत त्रुटी निर्माण होतील.

अधिकाऱ्यांनी सांगितले की पाकिस्तान सरकारने आयएमएफला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की वीज ग्रिडचे स्थिरीकरण आणि पुरवठ्यात काही समस्या आहेत. आयएमएफने या प्रकल्पाच्या निकषांत कोणताही लवचिकपणा दाखवलेला नाही. परंतु नवीन अटी टाकल्या आहेत. हा निर्णय औद्योगिक ग्राहकांना पटण्यासारखा नाही. त्यामुळे आता पाकिस्तान सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाकिस्तानात हिंसाचार! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला गालबोट; 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू.. 

follow us