Air Raid War Siren History : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात जम्मू-काश्मीरसह अन्य देशातील राज्यांमध्ये काल (दि.10) रात्रीची शांतता फक्त दोन गोष्टींनी भंग होत होती. त्या दोन गोष्टी म्हणजे पाकिस्तानकडून नष्ट करण्यात येणारे ड्रोन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाजणारे सायरन (Siren) होय. मध्यरात्रीच्या सुमारास जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागात हवाई हल्ल्याच्या इशारा देणारा सायरनचा आवाज ऐकू आला. यानंतर संपूर्ण परिसरातील वीज खंडित करून ब्लॅकआऊट करण्यात आला. या सर्व तणावाच्या परिस्थितीत विश्वयुद्धपासून ते आताच्या भारत आणि पाकिस्तान तणावापर्यंतच्या परिस्थितीत सायरन वाजवून करोडो नागरिकांचा जीव वाचवणाऱ्या सायरचा इतिहास ही सायरन सिस्टीम कधी सुरू झाली? याबद्दल जाणून घेऊया…
India-Pak War : पाकिस्तानची आता खैर नाही; मोदी सरकारचा लष्करप्रमुखांना विशेष अधिकार
सायरन ऐकू आल्यावर काय करावे?
सायरन म्हणजे धोक्याची घंटा. पाकिस्तानसोबतचा तणाव (India-Pakistan War) शिगेला पोहोचला आहे आणि सरकारकडून रेड अलर्ट जारी करण्यासाठी सायरनचा वापर केला जात आहे. सायरन वाजताच, तुम्हाला तुमच्या घरात किंवा कोणत्याही छताखाली येऊन सर्व दिवे बंद करायचे आहेत. सायरन वाजल्यानंतर प्रशासनाकडून वीज खंडित केली जाईल. ब्लॅकआउटदरम्यान तुम्ही दिवे लावण्यासाठी इन्व्हर्टर आणि जनरेटरचा वापर करू नये.
India-Pak War : भारत अन् पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालंय का? कोण करतं औपचारिक घोषणा…
युद्धात सायरन कसं बनलं धोक्याचा संकेत?
१९३७ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा, इशारा म्हणून सायरनचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. जर्मन सायरन उत्पादक कंपनी हरमन ग्रुपच्या अहवालानुसार, या युद्धादरम्यान जर्मनीमध्ये हवाई हल्ल्यांबद्दल जनतेला इशारा देण्यासाठी सुमारे ११,००० सायरन वाजवण्यात आले. या कामाव्यतिरिक्त हे सायरन इतरत्र वापरण्याची परवानगी नव्हती. त्यांचा वापर फक्त हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यांसाठी आणि धोका टळल्यानंतर सर्व माहिती देण्यासाठी केला जाऊ शकत होता.
ऑपरेशन सिंदूर सुरू असतानाच ट्रेंड होतंय ‘IC 814’; जाणून घ्या, कंधार विमान हायजॅकची कहाणी..
तथापि, या युद्धानंतर सायरनचे महत्त्व कमी झाले, परंतु ते केवळ थोड्या काळासाठी. त्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध सुरू होताच या सायरनचे महत्त्व पुन्हा वाढले. अणुहल्ल्याच्या भीतीमुळे सरकारे नागरी सुरक्षेबाबत अधिक गंभीर झाली. मोठे टॉवर बांधले गेले आणि त्यावर सायरन बसवले गेले. तेव्हापासून, इस्रायल-गाझा युद्ध असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध असो, कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याच्या बाबतीत रेड अलर्ट जारी करण्यासाठी या सायरनचा वापर करण्यात आला. त्याप्रमाणे सध्या भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीतही याच सायरनचा वापर नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यासाठी करण्यात येत आहे.