Download App

India Pakistan Tension : देशातील इंटरनेट बंद झाल्यास…’ही’ उपकरणे देणार महत्वाचे अपडेट्स

Which Devices Will Work Without Internet : जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध ( India Pakistan Tension) झाले, तर देशातील इंटरनेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्याला इंटरनेटशिवाय (Internet) काम करणारी उपकरणे लागतील. आज आपण अशा काही उपकरणांबद्दल जाणून घेऊ या, जे इंटरनेटशिवाय काम करतात. हे उपकरणं युद्ध सुरू होण्यापूर्वी खरेदी करणं गरजेचं आहे.

आजच्या काळात आपले जीवन बऱ्याच प्रमाणात इंटरनेटवर अवलंबून आहे. मोबाईल फोन, सोशल मीडिया, ऑनलाइन बँकिंग, अभ्यास आणि ऑफिसचे काम, सर्वकाही इंटरनेटशी जोडलेले आहे. पण जर एखाद्या दिवशी भारतात अचानक ( India Pakistan War) इंटरनेट काम करणे बंद झाले तर? युद्ध, दंगल किंवा कोणत्याही मोठ्या आपत्तीच्या वेळी इंटरनेट बंद होतं. अशा परिस्थितीत काय करायचं? हा सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. काही उपकरणे इंटरनेटशिवायही काम करतात. आपल्याला महत्त्वाच्या अपडेट्स आणि माहितीशी जोडून ठेवतात. ती उपकरणे कोणती आहेत, ते जाणून घेऊ या.

नगकरांनो सावधान! ८ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

एफएम रेडिओ
रेडिओ हे एक असे उपकरण आहे, जे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कशिवाय देखील काम करते. आपत्कालीन परिस्थितीत रेडिओ चॅनेलवरून सरकारी किंवा स्थानिक बातम्या मिळत राहतील. बॅटरी किंवा सौरऊर्जेवर चालणारा पोर्टेबल रेडिओ खरेदी करणे, हा एक योग्य निर्णय आहे.

हँड क्रॅंक रेडिओ
हा एक विशेष प्रकारचा रेडिओ आहे, जो हाताने फिरवल्याने चार्ज होतो. रेडिओसोबतच त्यात टॉर्च आणि USB चार्जिंग पोर्ट देखील आहे. वीज आणि इंटरनेटशिवायही काम करते.

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताचा मोठा निर्णय, धर्मशाळा विमानतळ बंद, आयपीएल सामने रद्द होणार?

उपग्रह फोन किंवा उपग्रह कम्युनिकेटर
सॅटेलाइट फोन किंवा जीपीएस उपकरणे इंटरनेटशी नव्हे तर थेट उपग्रहांशी जोडली जातात. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही संदेश पाठवू शकता. यापैकी काही उपकरणे SOS अलर्ट देखील पाठवू शकतात.

ऑफलाइन नकाशे आणि अ‍ॅप्स
जर तुमच्याकडे आधीच ऑफलाइन नकाशे (जसे की गुगल मॅप्सचे ऑफलाइन आवृत्ती) आणि आवश्यक कागदपत्रे असतील तर ती डाउनलोड करा. इंटरनेटशिवायही तुम्ही स्थान आणि माहिती मिळवू शकता.

एसएमएस अलर्ट सेवा
इंटरनेट बंद असताना काही सरकारी आणि वृत्तसंस्था एसएमएसद्वारे अपडेट्स शेअर करतात. यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागेल. टेलिकॉम कंपनीकडून एसएमएस अपडेटची सुविधा देखील घेऊ शकता. आपल्याला ही सर्व उपकरणे ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सहज मिळू शकतात. हे सवलतीत देखील खरेदी करू शकतो.

 

follow us