उरी, पुलवामा अन् पहलगाम.. प्रत्येक वेळी मोठी जखम; भारताने केला हिशोब चुकता

India Pakistan Tension : 22 एप्रिलचा दिवस भारतासाठी अत्यंत दुःखदायक होता. याच दिवशी भ्याड अतिरेक्यांनी पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यांचा धर्म विचारून ते हिंदू आहेत याची खात्री करून त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला (India Pakistan Tension) जन्माची अद्दल घडवा असा संताप प्रत्येक भारतीय व्यक्त करत होता. अखेर बुधवारी पहाटे भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानात घुसून (Operation Sindoor) हवाई हल्ले केले. अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त केले. पहलगामच्या जखमेचा हिशोब चुकता केला.
या हल्ल्याचं उत्तर भारत अशा पद्धतीने देईल याचा अंदाज कदाचित पाकिस्तान (Pakistan) आणि येथील अतिरेक्यांना नसावा. हा हल्ला म्हणजे सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) आणि एअर स्ट्राइक (Air Strike) दोन्ही प्रकारांतील होता. आज याच निमित्ताने अलीकडच्या काळातील भारताच्या धाडसी कारवायांची माहिती घेऊ या..
सर्जिकल स्ट्राइक कधी आणि का झाली
18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू काश्मिरातील उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या तळावर मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. भारतासाठी हा मोठा धक्का होता. या हल्ल्यानंतर देशातील सर्वसामान्यांच्या मनात पाकिस्तानबद्दल राग धुमसू लागला. पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली. तरी भारतीय सैन्याने संयमाने कार्यवाही केली. या हल्ल्यानंतर 11 दिवसांनंतर म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरात (Pak Occupied Kashmir) सैन्याच्या पॅरा स्पेशल कमांडोजने सात अतिरेकी अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राइक केली. हा हल्ला रात्रीच्या अंधारात करण्यात आला.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 90 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त
अतिरेकी गाढ झोपेत असतानाच सर्जिकल स्ट्राइक झाली. भारतीय जवानांनी मोहीम फत्ते केली आणि सुरक्षित स्वदेशात वापसी केली. या हल्ल्या अनेक दहशतवादी मारले गेले तसेच त्यांना प्रशिक्षण देणारेही ध्वस्त झाले. सुरुवातीला पाकिस्तानने या स्ट्राइकचा दावा नाकारला होता. नंतर मात्र स्वतःहून हल्ल्याची कबुली देत आमचे यात काहीच नुकसान झाले नाही असे सांगितले.
पुलवामाच्या जखमेमंतर भारताची एअर स्ट्राइक
14 फेब्रुवारी 2019 देशाला आणखी एक हल्ल्याच्या रुपाने मोठी जखम झाली. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. हा हल्ला स्थानिक दहशतवादी आदिल अहमद डारने एका कारच्या मदतीने केला. शहीद झालेले जवान देशाच्या विविध राज्यांतील होते. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर भारताने योजना तयार केली. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी म्हणजेच हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर भारतीय जवानांनी मिराज 200 फायटर जेट घेऊन थेट पाकिस्तानात धडक मारली. बालाकोट येथे दहशतवादी संघटनेचे ट्रेनिंग सेंटर एअर स्ट्राइक करुन उद्ध्वस्त केले.
या हल्ल्यात दहा बॉम्ब टाकण्यात आले असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला. ही कारवाई पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यात झाली होती. या हल्ल्यात जवळपास तीनशे दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Crisis) दोघांनीही आकडा जाहीर केला नाही.
या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारतीय सैन्यातील विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानात कोसळले. अभिनंदन यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. परंतु, भारताने आपल्या बळाचा वापर करत फक्त दोनच दिवसांच्या आत अभिनंदन यांना सुखरुप भारतात आणले. भारताच्या या मुत्सद्देगिरीचं देशभरात कौतुक झालं.
भारताचा स्पष्ट अन् कठोर संदेश
भारताने या दोन्ही मोहिमांची माहिती जगाला दिली. आम्ही फक्त दहशतवाद्यांवर कारवाई केली. पाकिस्तानची जनता आणि पाकिस्तानी सैन्याचे कोणतेच नुकसान केले नाही हे भारताने जगाला सांगितले. पाकिस्तान जर अतिरेक्यांना संरक्षण देईल तर भारत घुसून त्यांचा खात्मा करील असा स्पष्ट संदेश भारताने या माध्यमातून दिला होता. यानंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबल्या नाहीत.
भारताकडून ऑपरेशन सिंदूर! पहलगाम हल्ल्याचा बदला, शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून मारलं
पहलगामचा बदला ऑपरेशन सिंदूर
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करारा जवाब दिला आहे. बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइक केला. (Sindoor) त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं आहे. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं. भारताच्या पराक्रमी सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांना टार्गेट केलं आहे.