Dead Butt Syndrome : ऑफिसमध्ये दररोज 8-9 तास एकाच ठिकाणी काम करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एका रिसर्चनुसार, एकाच ठिकाणी जास्त काळ बसून काम केल्याने हिप स्नायू (Hip Muscles) धोक्यात येतात. माहितीनुसार, या अवस्थेत स्नायूचा ग्लूटीअल ऍम्नेशिया खराब होतो, त्याला डेड बट सिंड्रोम असे नाव देण्यात आले आहे. जर एखादा रुग्ण या अवस्थेत आला तर त्याला उभे राहणेही कठीण होते असा खुलासा एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.
जास्त वेळ बसणे, ड्रायव्हिंग करणे आणि जास्त स्क्रीन टाइम हे डेड बट सिंड्रोमचे लक्षणे आहे. डेड बट सिंड्रोममुळे गुडघ्याला दुखापत, हिप दुखणे आणि पाठीच्या खालच्या भागात समस्या यासह विविध समस्या उद्भवू शकतात. रिसर्चनुसार, जे लोक आपल्या दिवसाचा जास्त भाग संगणक किंवा स्क्रीनवर घालवतात त्यांच्यामध्ये डेड बट सिंड्रोमचे लक्षणे दिसून येतात.
जाणून घ्या ते शरीराला कसे हानी पोहोचवते
माहितीनुसार, ग्लूटील स्नायूंना हिप स्नायू म्हणतात जे जास्त वेळ बसून राहिल्यास कमकुवत होऊ लागतात आणि जर ही समस्या आजारात रुपांतर झाली तर नितंबांच्या अगदी खाली असलेले हॅमस्ट्रिंग स्नायू फाटू लागतात, त्यानंतर सायटिका होऊ लागते आणि नंतर शिन स्प्लिंट्समध्ये समस्या निर्माण होते, म्हणजे पायांच्या खाली असलेले स्नायू फाटू लागतात आणि यानंतर गुडघ्यांमध्ये सांधेदुखीचा त्रास सुरू होते.
डेड बट सिंड्रोम कधी होतो?
डेड बट सिंड्रोम म्हणजेच ग्लूटील ॲम्नेशिया ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा तुमच्या नितंबांचे स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात. जेव्हा पाठीच्या स्नायूंचा वापर कमी होतो तेव्हा हे स्नायू त्यांना कोणते काम करायचे हे विसरून जातात आणि जास्त वापर न झाल्याने हे स्नायू खराब होतो. या रोगाच्या स्थितीत, नितंबांचे स्नायू पाय आणि हातांच्या स्नायूंपासून पूर्णपणे वेगळे होतात आणि त्याच्या नसा संकुचित होतात. त्यामुळे दुखापत झाली तरी आतून वेदना जाणवतात.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर तुमचे नितंब खरोखरच खराब असतील तर यानंतर खूप कठीण जाईल कारण एक वेळ अशी येईल की तुम्ही उभेही राहू शकणार नाही, म्हणजेच ही परिस्थिती खूप गंभीर प्रश्न निर्माण करते.
हिप समस्या
दीर्घकाळ बसल्याने हिप फ्लेक्सर्स घट्ट आणि लहान होऊ शकतात, तर ग्लूट्स कमकुवत होऊ शकतात. या असंतुलनामुळे हिप दुखण्याची शक्यता जास्त असते.
डेड बट सिंड्रोमची लक्षणे
डेड बट सिंड्रोमची लक्षणे बदलू शकतात परंतु अनेकदा त्यात खाली दिलेल्या लक्षणांचा समावेश असतो.
1. हालचाल करण्यात अडचण
कमकुवत ग्लूट स्नायूंमुळे पायऱ्या चढणे, धावणे किंवा दीर्घकाळ उभे राहणे यासारख्या हालचाली करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
2. पाठीच्या खालच्या भागात दुखणे
कमकुवत ग्लूट्समुळे खालच्या पाठीवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता येते.
3. ग्लूट वेदना
स्नायूंच्या निष्क्रियतेमुळे तुम्हाला तुमच्या नितंबांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
काळजी कशी घ्यावी
याबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला नितंबांचा ग्लुटीयस स्नायू सक्रिय ठेवायचा असेल तर तुम्ही सतत बसण्याऐवजी अर्धा तास जागेवरून उठले पाहिजे किंवा दुसरी काहीतरी क्रिया करत राहावे ज्यामुळे शरीर सक्रियपणे काम करत राहील. तुमचे स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी दर 30 ते 60 मिनिटांनी चालण्याची क्रिया तुम्ही करू शकतात ज्यामुळे तुमचे स्नायू सक्रिय राहणार.
“बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज पण, नावं घेणार नाही”; फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?
अर्गोनॉमिक ऍडजस्टमेंट
ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्ही तुमच्या पाठीला आधार देणारी खुर्ची वापरू शकतात तसेच काम करताना तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि ताण कमी करण्यासाठी तुमच्या डेस्क आणि मॉनिटरची उंची वाढवा.