Winter sessions : भारतीय जनता पक्षाने आज लोकसभेतील सर्व खासदारांना व्हीप जारी करून संसदेच्या अधिवेशनासाठी (Winter sessions) 8 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भाजपने (BJP) आपल्या खासदारांना महत्त्वाच्या विधायी कामकाजावर चर्चा करण्यासाठी आणि सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार काही महत्त्वाचे विधेयक सादर करण्याची शक्यता आहे.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा (LokSabha Election 2024) निवडणुकीपूर्वी पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन मोठ्या राज्यात यश मिळाले आहे. या विजयाने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या विजयानंतर भाजपचे पुढचे लक्ष आता लोकसभा निवडणुकीवर आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे हिवाळी अधिवेशन भाजपसाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महायुतीचा निवडणुकीआधीच डाव! हिवाळी अधिवेशनात 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
दरम्यान, हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक 2023 लोकसभेत मांडले होते. ही दोन्ही विधेयक बहुमतांनी मंजूर केली आहेत. त्यात काश्मिरी पंडित समाजातील दोन सदस्य आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील विस्थापितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका सदस्याला विधानसभेत नामनिर्देशित करण्याची तरतूद आहे.
‘सत्यजित आवाज देत नाहीस, तुम्हीच आवाज बंद केला’; चव्हाणांच्या सवालावर तांबेंचं खास शैलीत प्रत्युत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत नवीन काश्मीर विधेयक मांडणार आहेत. या विधेयकाला लोकसभेने अगोदरच मंजुरी दिली आहे. केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक 2023 लोकसभेत सादर करण्यात आले आहे.