‘सत्यजित आवाज देत नाहीस, तुम्हीच आवाज बंद केला’; चव्हाणांच्या सवालावर तांबेंचं खास शैलीत प्रत्युत्तर

‘सत्यजित आवाज देत नाहीस, तुम्हीच आवाज बंद केला’; चव्हाणांच्या सवालावर तांबेंचं खास शैलीत प्रत्युत्तर

Satyajeet Tambe & Ashok Chavan : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशनाला(Winter Session) आजपासून उपराजधानी नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाला राज्यातील सर्वच आमदारांनी हजेरी लावली आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, गोंधळ होत असतोच. सध्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या एका व्हिडिओची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. व्हिडिओमध्ये अशोक चव्हाण यांनी सत्यजित तांबेंना केलेल्या सवालावर सत्यजित तांबे यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण’.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक

व्हिडिओमध्ये अशोक चव्हाण म्हणाले, काय सत्यजित आवाज देत नाहीस.., त्यावर सत्यजित तांबे म्हणतात, साहेब तुम्हीच आवाज बंद केला, असं प्रत्युत्तर तांबे यांनी खास शैलीत दिलं आहे. तांबेंनी प्रत्युत्तर देताच उपस्थित सर्वच नेत्यांना विधान परिषदेची निवडणूक आठवली.

विधानपरिषेदच्या निवडणुकीमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे. सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे या मतदारसंघातून आमदार होते. मात्र, मागील निवडणुकीत काँग्रेसने सुधीर तांबेंना एबी फॉर्म दिला मात्र, त्यांच्याजागी सत्यजित तांबे यांनीच आपला उमेदवारी भरल्याचं पाहायला मिळालं होतं.

Maratha Reservation : मनोज जरांगेंना एक महिना मुख्यमंत्री करा; ‘नायक’च्या धर्तीवर रिक्षाचालकाची अजब मागणी

या नाट्यमय घडामोडीवरुन काँग्रेसच्या हायकमांड नेत्यांनी तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. काँग्रेसमध्ये असताना सत्यजित तांबे यांनी युवक प्रदेशाध्यक्षपदाची धुरा चांगल्या प्रकार सांभाळली. तांबे यांनी राज्यभरात युवकांचं मोठं संघटन उभं केलं. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी नगर विधानसभा निवडणुकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अखेर नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवून सत्यजित तांबे जिंकले आहेत. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि तांबे घराण्यात चांगलीच शाब्दिक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे भाचे आहेत. सत्यजित तांबे यांनी विधान परिषद निवडणुकीत केलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे बाळासाहेब थोरात यांना आपला गटनेतेपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. अखेर निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसमध्येच असल्याचं सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे आता हिवाळी अधिवेशनात सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान, ते काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेत आहेत. या भेटीदरम्यान, होत असलेल्या चर्चेची सर्वत्र होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube