BRS कडून फक्त जाहिरातीत गुलाबी चित्र, वास्तव समजल्याने जनतेने…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

  • Written By: Published:
BRS कडून फक्त जाहिरातीत गुलाबी चित्र, वास्तव समजल्याने जनतेने…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

Telangana Elections : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निकालात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला (Congress) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तर तेलंगणात काँग्रेसने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची दशकभराची सत्ता उलथून टाकली. काँग्रेसला 64 जागा मिळाल्या. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला 39 जागांवर समाधान मानावे लागले. यावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली. तेलंगणातील बीआरएसचे (BRS) वास्तव समजल्याने लोकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.

Rajasthan Result 2023 : इम्रान खान यांचा पराभव करून महंत बालकनाथ विजयी; आता CM पदाच्या शर्यतीत 

तेलंगणातील कॉंग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया देतांना चव्हाण यांनी सांगितले की, तेलंगणातील बीआरएसचे राज्य सरकार केवळ सवंग प्रसिद्धीसाठी घोषित केलेल्या योजनांवर आणि अवास्तव प्रसिद्धीवर तगले होते. जाहिरातीमध्ये भलेही गुलाबी चित्र रंगवले जात होते, मात्र वस्तुस्थिती काळीकुट्ट होती. कधी ना कधी खरे चित्र समोर येणारच होते आणि वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मतदार कॉंग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे झाले.

तेलंगणाच्या डीजीपींना रेवंत रेड्डींची भेट नडली, निवडणूक आयोगाने केलं निलंबित 

बीआरएसने शेतकर्‍यांना वर्षाला फक्त 10,000 रुपये देऊन इतर सर्व योजना जवळजवळ रद्द केल्या. तेलंगणामध्ये मोफत पीककर्ज नव्हते, पीक विमा नव्हता. एमएसपीनुसार कृषी माल खरेदी करण्याची व्यवस्था नाही, खाजगी खरेदीदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू होती, त्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सिंचन प्रकल्पावरील खर्च वाढवून भ्रष्टाचार सुरू हता. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. सरकारी मंडळे, महामंडळे, शासकीय योजनांसाठीच नव्हे, तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासाठीही बीआरएसच्या सरकारकडे पैसे नव्हते. कर्ज काढून, सरकारी जमिनी विकून आणि दारू दुकानांना बिनदिक्कतपणे परवाने वाटून राज्य सरकार दिसव पुढे ढकलत होते. रोजगार निर्मिती, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था याकडे पूर्ण कानाडोळा करण्यात आला होता. त्यामुळे तेलंगणाच्या मतदारांनी बीआरएसला नाकारून काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून दिले.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचे निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल या दोघांनी चांगले काम केले आणि चांगल्या योजना राबवल्या. दोघांची प्रतिमा खूप चांगली होती. चव्हाण म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी या तिन्ही राज्यांच्या निकालांचे विश्लेषण करून त्यातील त्रुटी शोधून त्या दुरुस्त केल्या जातील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube