Download App

“बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज पण, नावं घेणार नाही”; फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?

बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज आहे, त्यांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत फडणवीसांना विरोधकांना खोचक टोला लगावला.

Devendra Fadnavis : राज्यात आज घरोघरी मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन (Ganesh Festival 2024) झालं. आज सगळीकडे गणेशोत्सवाचा आनंद अन् जल्लोष दिसून येत आहे. राजकीय नेत्यांनीही गणरायाचं (Ganesh Chaturthi) स्वागत करून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही (Devendra Fadnavis) गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज आहे, त्या सर्वांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत विरोधकांना खोचक टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

महायुतीच्या नेत्यांच्या मनातही CM पदासाठी फडणवीसांचे नाव नाही, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

गणेशोत्सवाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. गणेशाने (Ganeshotsav 2024) सर्वांचे दुःख हरावे सर्वांचे विघ्न दूर करावे. सर्वांना सुख समाधान आणि आरोग्य मिळावं अशी प्रार्थना मी विघ्नहर्त्याच्या चरणी केली. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पोलीस सज्ज आहेत. त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी सजग राहावे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी डोळे उघडे ठेवले तर ते सुद्धा पोलिसांना मदत करू शकतात.

निवडणूक आहे बाप्पांकडे काय मागितलं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता फडणवीस म्हणाले, बाप्पांना हे चांगलं माहित आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं. ते बाप्पांनी पाहिलं आणि बाप्पाला मानणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी पाहिलंय. त्यामुळे मला वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. भक्तांनाही तसं काही फार मागावच लागत नाही. ते सगळं काही देतात.

सद्बुद्धी देण्याची कुणाला गरज आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना खोचक टोला लगावला. बऱ्याच लोकांना सद्बद्धी देण्याची गरज आहे. मी त्यांची नावं घेणार नाही पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पा चरणी प्रार्थना आहे, असे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिले.

जयंत पाटलांनी टेन्शन वाढवलं! देवेंद्र फडणवीस अन् शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत संवाद? 

follow us