महायुतीच्या नेत्यांच्या मनातही CM पदासाठी फडणवीसांचे नाव नाही, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
Aditya Thackeray: महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यावरून चाललेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं? यासाठी जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चेहरा नक्कीच नाही, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली. त्यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Pankaj Deshmukh : मोठी बातमी! पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती
आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या डोक्यात उद्धव ठाकरे यांचे नाव नसेल, तर देवेंद्र फडणवीस यांचंही नाव नाही. शरद पवारच काय तर महायुतीच्या नेत्यांच्या मनातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, अशा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
भारतात येताच न्यूझीलंडकडून ‘खेला’, ‘या’ माजी खेळाडूंवर दिली मोठी जबाबदारी, सावधान टीम इंडिया
फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरही टीका केली होती. या टीकेलाही आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार केला, त्यांना जोडे मारणंही कमी आहे. भाजप इतका निर्लज्ज कसा होऊ शकतो? एवढेच नाही तर पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि अन्य नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आलं. त्या हेलिपॅडवर पुतळ्यापेक्षाही जास्त खर्च झाला, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
मुख्यमंत्री निर्लज्जपणे बोलतात…
यावेळी बोलतांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली. ते म्हणाले, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्षांपासून उभा आहे, तिथं उन, वारा, बर्फ सगळंच पडत आहे. पण आपल्या इथे मुख्यमंत्री निर्लज्जपणे वाऱ्यामुळे पुतळा पडल्याचे सांगतात, असे आदित्य ठाकरे म्हणाले.