भारतात येताच न्यूझीलंडकडून ‘खेला’, ‘या’ माजी खेळाडूंवर दिली मोठी जबाबदारी, सावधान टीम इंडिया

  • Written By: Published:
भारतात येताच न्यूझीलंडकडून ‘खेला’, ‘या’ माजी खेळाडूंवर दिली मोठी जबाबदारी, सावधान टीम इंडिया

AFG vs NZ: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ (AFG vs NZ) भारत दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा संघ एकमवे सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार न्यूझीलंडच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी भारतीय क्रिकेटपटू विक्रम राठोर (Vikram Rathore) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासाठी विक्रम राठोर यांनी सहा कसोटी सामने खेळले आहेत.

भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे प्रमुख सहाय्यकांपैकी एक म्हणून त्यांनी भारतीय संघाबरोबर काम केले आहे. याच बरोबर न्यूझीलंडने श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज रंगना हेराथची (Rangana Herath) गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हेराथ पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकची जागा घेणार आहे. माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकला मोठी जबाबदारी दिली आहे.

न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक स्टीड म्हणाले की, “आम्ही रंगना आणि विक्रमला आमच्या कसोटी संघात सामील करून घेण्यास खूप उत्सुक आहोत. क्रिकेट जगतात दोघांचाही खूप आदर केला जातो आणि मला माहित आहे की आमचे खेळाडू त्यांच्याकडून शिकण्याच्या संधीची वाट पाहत आहेत. आमच्या तीन डावखुऱ्या ऑर्थोडॉक्स फिरकीपटूंसाठी, विशेषत: एजाज (पटेल), मिच (सेंटनर) आणि रचिन (रवींद्र) यांच्यासाठी उपखंडातील तीन कसोटी सामन्यांमध्ये रंगनासोबत काम करणे खूप फायदेशीर ठरेल.

“मुलीला हाताशी धरून घर फोडण्याचं काम पण..” दादांच्या मंत्र्याचा शरद पवार गटावर हल्लाबोल

न्यूझीलंडचा संघ ग्रेटर नोएडाला पोहोचला

तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे पोहोचला आहे. हा सामना ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे रंगना हेराथ आणि विक्रम राठोड यांच्या नियुक्तीबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube