“मुलीला हाताशी धरून घर फोडण्याचं काम पण..” दादांच्या मंत्र्याचा शरद पवार गटावर हल्लाबोल

“मुलीला हाताशी धरून घर फोडण्याचं काम पण..” दादांच्या मंत्र्याचा शरद पवार गटावर हल्लाबोल

Maharashtra Elections 2024 : विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections 2024) आलेल्या असतानाच राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. विरोधी महाविकास आघाडीकडे इच्छुकांचा ओढा वाढू लागला आहे. त्यातही शरद पवार गटाकडे (Sharad Pawar) इनकमिंग वाढलं आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका राज्य सरकारमधील मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा अत्राम यांना (Dharmarao Baba Atram) बसला आहे. पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचं काम करत आहे, असा आरोप मंत्री आत्राम यांनी शरद पवार गटावर केला आहे. अत्राम यांची कन्या भाग्यश्री शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

आम्ही अजितदादांसाठी कामाला लागलोय; मंत्रिमंडळातील मोठ्या नेत्यानं दंड थोपटले

धर्मरावबाबा अत्राम चंद्रपूर येथील (Chandrapur News) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, विरोधक मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार असा सवाल अत्राम यांनी यावेळी केला. माझी खुर्ची घेण्याचा जे प्रयत्न करतील त्यांना मी बाजूला करणार आहे. मी काम करणारा माणूस आहे. सातत्याने कामच करत आलो आहे. पण आता हे मध्येच येऊन असं काही करणार असतील तर त्यांनी वाटी लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

मी तुमचं काम केलं अगदी इमाने इतबारे केलं. गेली पन्नास वर्षे या भूमीत राहणाऱ्या कष्टकरी आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम मी केलं. मी सतत काम करत आलो आहे. पण मध्येच येऊन जर हे अशा प्रकारचं वातावरण तयार करत असतील तर मग आपल्याला वाट लावण्याचं काम करावं लागेल. एक मुलगी गेली तरी चालेल. आणखी एक मुलगी माझ्याकडे आहे. मुलगाही आहे. एक भाऊ विरोधात गेला तो सुद्धा आता माझ्यामागे उभा राहिला आहे. इतकंच नाही तर माझ्या चुलतभावाचा मुलगा सुद्धा आता माझ्या सोबत आहे. त्यामुळे आता पूर्ण आत्राम घराणं एकत्र झालं आहे. त्यामुळे आता आत्राम घराणं हलगेकर (मुलगी आणि जावई) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे आत्राम म्हणाले.

तुम्हाला किंमत चुकवावी लागेल; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तिसऱ्यांदा नक्षलवाद्यांची धमकी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube