पाकिस्तानला धक्का, बांगलादेशकडून मालिका गमावली, रचला लज्जास्पद विक्रम

  • Written By: Published:
पाकिस्तानला धक्का, बांगलादेशकडून मालिका गमावली, रचला लज्जास्पद विक्रम

PAK vs BAN: पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकून बांगलादेशने (Bangladesh) इतिहास रचला आहे. ही मालिका बांगलादेशने मालिका 2-0 ने जिंकली. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा (Pakistan) 10 विकेट्सने तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने पराभव करत मालिकेसोबत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहे.

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा दुसरा डाव 172 धावांवर रोखला. हा सामना आणि मालिका जिंकण्यासाठी बांगलादेशला 185 धावांचे लक्ष्य होते.

पहिली कसोटी मालिका जिंकली

क्रिकेट इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा पाकिस्तानचा कसोटी मालिकेत पराभव केला आहे. ही मालिका बांगलादेशने 2-0 ने (PAK vs BAN 2024) जिंकली

पाकिस्तानने मायदेशात सर्व कसोटी सामने दुसऱ्यांदा गमावले

तर दुसरीकडे घरच्या मैदानात खेळताना कसोटी मालिकेत पाकिस्तानने दुसऱ्यांदा सर्व सामने गमावले आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला होता.

सलग 10 कसोटी सामन्यात एकही सामना जिंकता आला नाही

घरच्या मैदानात खेळताना पाकिस्तानने गेल्या 10 सामन्यात एकही सामना जिंकलेला नाही. गेल्या 10 सामन्यात पाकिस्तानला 6 सामन्यात पराभव तर 4 सामन्याचे अनिर्णित राहिले आहेत. झिम्बाब्वे आणि बांगलादेश व्यतिरिक्त, या शतकात कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर कोणतीही कसोटी न जिंकता खेळलेले हे सर्वाधिक सामने आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु, ‘या’ पद्धतीने करता येणार नाव नोंदणी

तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग श्रीलंकेने 2000 मध्ये केला होता. श्रीलंकेने 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता तर 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत बांगलादेश या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube